Wrestlers Protest : भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर जो वाद रंगला आहे तो अद्याप शमलेला नाही. अशातच दोन महिला मल्लांमध्ये ट्विटर कुस्ती पाहण्यास मिळते आहे. साक्षी मलिकने तिचा पती सत्यवत कादियानसह एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने बबिता फोगाटचं नाव घेतलं होतं. या आरोपांवर बबीता फोगाटने उत्तर दिलं आहे. कुस्तीगीरांनी काँग्रेसच्या इशाऱ्यावर आंदोलन केल्याचा आरोप बबिता फोगाटने केला. त्यानंतर साक्षीने तिला पुन्हा उत्तर दिलं. आरोप प्रत्यारोपांची ट्विटर कुस्तीच या दोघींमध्ये पाहण्यास मिळाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
WFI चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर जानेवारी महिन्यात दोन महिला मल्लांनी भेदभाव केल्याचा आणि छेडछाड केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सरकारतर्फे समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं गेलं. या आश्वासनानंतर धरणे आंदोलन बंद केलं गेलं. तीन महिन्यानी इतर महिला मल्लांनी पुन्हा आंदोलन सुरु केलं. त्यात एका अल्पवयीन मुलीसह आमचं लैंगिक शोषण ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केल्याचा आरोप केला होता. त्यांना WFI च्या पदावरुन हटवण्याची आणि अटक करण्याची मागणी या सगळ्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर FIR दाखल करण्यात आली. मात्र अल्पवयीन मुलीने नंतर जबाब बदलले. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही असं कोर्टाला सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.
या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत यांनी शनिवारी एक व्हिडीओ ट्वीट केला. या संपूर्ण आंदोलनाच्या मागे भाजपा नेते तीरथ राणा यांचा आणि बबिता फोगाटचा हात आहे असा आरोप केला. साक्षीने आपल्या व्हिडीओत असं म्हटलं आहे की दिल्लीतल्या जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन करा असा सल्ला आम्हाला या दोघांनीच दिला होता. दोघांनी आम्हाला दिल्लीत धरणं धरण्यासाठी मंजुरी मिळवून दिली होती. जंतरमंतर पोलीस ठाण्यातून ही संमती देण्यात आली होती. दुसरीकडे काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनी हे आंदोलन काँग्रेसच्या इशाऱ्यावर झाल्याचे आरोप फेटाळले आहेत.
साक्षीने जो व्हिडीओ ट्वीट केला त्यानंतर बबिताने दिलं उत्तर
बबिता फोगाटने ट्वीट करत म्हटलं आहे की , “मला काल खूपच दुःख झालं कारण मी माझ्या लहान बहिणीचा (साक्षी मलिक) तिच्या पतीसह असलेला व्हिडीओ पाहिला. जो कागद साक्षी दाखवत होती त्यावर माझी सही नाही. तसंच मी संमती मिळवून दिली याचा तो पुरावा नाही. मला या सगळ्याशी काहीही घेणंदेणं नाही.” या आशयाचं एक ट्वीट बबिता फोगाटने केलं आहे.
यावर साक्षीने म्हटलं आहे की आम्ही बबिता फोगाट आणि तीरथ राणा यांच्यावर टीका केली होती. आपल्या स्वार्थासाठी मल्लांचा कसा उपयोग करत आहेत हे आम्ही सांगितलं आणि जेव्हा संकट आलं तेव्हा हे दोघंही सरकारच्या मांडीवर जाऊन बसले. असा आरोप साक्षी मलिकने केला आहे.
साक्षी आणि तिच्या पतीने व्हिडीओत काय म्हटलं होतं?
साक्षी आणि तिच्या पतीने एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यात साक्षीने असं म्हटलं होतं की सगळ्या कुस्तीगीरांमध्ये एकजूट नव्हती. त्यामुळे आम्ही दीर्घकाळ आंदोलन करु शकलो नाही. प्रत्येक व्यक्ती आवाज उठवू शकत होती. कुस्ती हे करिअर निवडणारे खेळाडू अनेकदा गरीब कुटुंबातून येतात. त्यांच्यात एवढ्या मोठ्या शासन व्यवस्थेला टक्कर देण्याची किंवा त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची ताकद नसते हे तुम्ही पाहिलं आहे. असं म्हणत साक्षीने बबिता फोगाटच्या सहीचं एक पत्र दाखवलं होतं. मात्र आता बबिताने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. तसंच आपला या आंदोलनाशी संबंध नाही असं म्हटलं आहे.