भारतीय महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्याविरोधात जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आज शेतकरी संघटना आणि खाप पंचायतीचे बळ मिळाले. आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह हरियाणा आणि पंजाबमधील अनेक नेत्यांनी खेळाडूंची भेट घेतली. दरम्यान, शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. ब्रिजभुषण सिंह यांना १५ दिवसांत अटक न झाल्यास मोठा निर्णय घेतला जाईल, असं टिकैत म्हणाले. आज तकने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रविवारी सायंकाळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, “कुस्तीगीरांनी न्यायासाठी संघर्ष सुरू ठेवावा. ब्रिजभुषण सिंह याला अटक व्हावी अशी युनायटेड किसान मोर्चा आणि खापची मागणी आहे. २१ मेपर्यंत ब्रिजभुषणला अटक न केल्यास मोठा निर्णय घेतला जाईल”, असंही ते म्हणाले.

“२१ मेपर्यंत आंदोलन सुरू राहील. २१ मे रोजी पुढील रणनीतीसाठी रोडमॅप तयार केला जाईल. खेळाडूंचा अपमान आम्ही सहन करणार नाही. हे कुस्तीगीर देशाची संपत्ती आहेत. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट २१ मेपर्यंत जंतरमंतरवर राहतील. येथेच राहतील, येथेच प्रॅक्टिस करतील आणि आंदोलन सुरू ठेवतील”, असंही राकेश टिकैत म्हणाले.

आज सायंकाळी कँडल मार्चचे आयोजन

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक कुस्तीगीर अधिक आक्रमक झाले आहेत. आज सायंकाळी सात वाजता देशभर कँडल मार्च काढण्याचे आवाहन त्यांनी देशवासियांना केले आहे. साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.

हेही वाचा >> “भारतीय मुलींच्या न्यायासाठी…”, कुस्तीगीरांची देशवासियांना कळकळीची विनंती

जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विनेश फोगाटने प्रसारमाध्यमांचे आभार मानत आपण जी लढाई लढत आहोत ती जिंकली पाहिजे असे सांगितले. ती म्हणाली की, “आमच्या समर्थनार्थ जंतरमंतरवर येणार्‍या सर्व लोकांना आवाहन करण्यात येते की, पोलिसांशी संघर्ष करू नये आणि त्यांना सहकार्य करावे. पोलिसांनाही विनंती आहे की, कोणालाही अडवू नका कारण तुम्ही सहकार्य कराल तर आम्हीही सहकार्य करू.”