कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांनी आता त्यांची पदकं गंगेत सोडण्याची घोषणा केली आहे. बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या तिघांनीही सोशल मीडियावर एकसारखेच ट्वीट करत आपली या विषयीची भूमिका मांडली आहे. आम्हाला मिळालेली पदकं आम्ही गंगेत विसर्जित करत आहोत. कारण ती गंगामाई आहे. आम्ही जेवढं पवित्र गंगामाईला मानतो तेवढीच मेहनत आम्ही हे पदकं मिळवण्यासाठी केली होती. असंही कुस्तीगीरांनी म्हटलं आहे. आम्हाला आमची पदकं प्राणांहून जास्त प्रिय आहेत पण ती आता गंगेत विसर्जित करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही असंही या कुस्तीगीरांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे या कुस्तीगीरांनी पत्रामध्ये ?

२८ मे रोजी आमच्या आंदोलनाबाबत पोलीस जे वागले ते सगळ्यांनी पाहिलं आहे. आम्हाला अत्यंत क्रूरपणे अटक करण्यात आली, आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. मात्र आमचं आंदोलन उधळण्यात आलं. पोलिसांनी आम्ही जिथे आंदोलन करत होतो ती जागाही आमच्याकडून हिरावून घेतली. पुढचे दोन दिवस आमच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे FIR दाखल करण्यात आले. महिला कुस्तीगीरांच्या लैंगिक शोषणाला आम्ही वाचा फोडली. जो दोषी आहे त्या विरोधात कारवाईची मागणी केली. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करतो आहोत. मात्र पोलीस आम्हाला अपराध्यांसारखं वागवत आहेत. तर ज्याने लैंगिक शोषण केलं तो व्यक्ती उजळ माथ्याने समाजात वावरतोय. आमच्यावर टीका करतो आहे.

ie thinc fourth edition
‘हवामान बदल थोपवण्यासाठी निधीची गरज’
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
rahul gandhi on sebi
“छोट्या गुंतवणूकदारांचे १.८ लाख कोटी रुपये लुटणारे…”; राहुल गांधींचा पुन्हा सेबीवर हल्लाबोल; म्हणाले…
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Odisha army officers fiance sexual assault news
Priyanka Gandhi : ओडिशातील ‘त्या’ घटनेवरून राहुल गांधींसह प्रियांका गांधींचं भाजपा सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “यांचं सरकार पोलिसांना…”
police file case against workers for stolen jewellery worth rs 32 lakh from shop
सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागिर पसार; रविवार पेठेतील घटना
BAPS Swaminarayan Temple
न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा, भारतीय दुतावासाने नोंदवला तीव्र निषेध
annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”

टीव्हीवर महिला कुस्तीगीरांविषयी अशी वक्तव्य करतो आहे ज्यामुळे त्यांना त्याची लाज वाटेल. आज घडीला एक महिला कुस्तीगीर मनातून काय विचार करते आहे हे कुणाला कळलं आहे का? या महिला कुस्तीगीराला वाटतंय की देशात आमचं कुणीही राहिलेलं नाही. आता आम्हाला ते क्षण आठवत आहेत जेव्हा या देशासाठी आम्ही पदकं जिंकली होती. असं या महिला पैलवानांनी म्हटलं आहे.

आता आम्हाला असंही वाटू लागलं आहे की ही पदकं आम्ही का जिंकली? आमच्यासह इतकं घाणेरडं गैरवर्तन व्हावं म्हणून ही पदकं जिंकली होती का? सोमवारचा पूर्ण दिवस महिला कुस्तीगीर या शेतांमध्ये लपत फिरत होत्या. पीडित महिला कुस्तीगीरांचं आंदोलन तोडण्याचा पूर्ण प्रयत्न होतो आहे. आमच्या गळ्यात जी मेडल्स घातली गेली त्याचा काही अर्थ उरलेला नाही असंच वाटतं आहे. ही पदकं परत करण्याचा विचार करुन आम्हाला मृत्यू येईल का? असंही वाटत होतं. मात्र आमच्या स्वाभिमानासह तडजोड करुन आम्ही राहू शकत नाही. त्यानंतर आमच्या मनात हा प्रश्नही आला की पदकं परत करायची असतील तर कुणाला? आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिलाच आहेत. मात्र त्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत मौन बाळगलं आहे.

आमचे पंतप्रधान जे आम्हाला आपल्या घरातल्या मुली मानत होते..त्यांनी २८ तारखेचा संपूर्ण दिवस हा नव्या संसदेच्या उद्घाटनात घालवला. आमचा अजूनही विश्वास बसलेला नाही. पण आमच्या आंदोलनाची साधी चौकशीही पंतप्रधानांनी केली नाही. त्याऐवजी त्यांनी नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात आणि पूजा-अर्चा करण्यात धन्यता मानली. नव्या संसदेच्या उद्घाटनाला आमचं लैंगिक शोषण करणाऱ्यालाही बोलावलं होतं. त्याने शुभ्र कपडे घालून फोटो काढले जणू काही तो आम्हाला हे सांगू इच्छित होता की मीच सगळं ठरवणार.

जे शुभ्र चमकादार तंत्र आमच्या विरोधात वापरलं गेलं त्यात भारताच्या मुलींसाठीची जागा कुठे आहे? फक्त नारे आणि घोषणा देण्यापुरत्याच त्या वल्गना होत्या का? आम्हाला ही पदकं नकोत. आधी आमचं शोषण केलं जातं, त्यानंतर आम्ही त्याला वाचा फोडली की आम्हाला तुरुंगात डांबलं जातं. ही सगळी पदकं आम्ही आता गंगेत विसर्जित करणार आहोत. गंगेला आम्ही पवित्र मानतो. आम्ही देशासाठी मिळवलेली ही पदकं अत्यंत पवित्र आहेत. त्यामुळे या पदकांची जागा पवित्र गंगा माईच असू शकते. ही पदकं आमचा प्राण, आमचा आत्मा आहेत. एकदा ही गंगेत विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याचा उद्देशही संपेल. त्यामुळे आम्ही इंडिया गेट या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत. इंडिया गेट आम्हाला त्या शहिदांची स्मृती सांगेल ज्यांनी देशासाठी आपले प्राण पणाला लावले. आम्ही त्यांच्यासारखं बलिदान दिलेलं नाही. मात्र देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असताना आमच्या मनात या सैनिकांसारखीच भावना होती असं पत्र या सगळ्या कुस्तीगीरांनी लिहिलं आहे.