भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची नार्को टेस्ट केली जावी अशी मागणी होते आहे. त्यांच्या विरोधात लैंगिक छळाचे आरोप असून विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक महिला कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. आता याच मागणीनंतर बृजभूषण सिंह यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपण कुठल्याही टेस्टला तयार आहोत पण आपली एक अट आहे असं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे बृजभूषण सिंह यांनी?

“मी माझी नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट कुठलीही टेस्ट करायला तयार आहे. मात्र माझी ही अट आहे की माझ्यासह विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचीही चाचणी केली जावी. हे दोन्ही पैलवान जर त्यांची टेस्ट करायला तयार असतील तर त्यांनी पत्रकार परिषद बोलवून तशी घोषणा करावी. त्यांनी घोषणा केली तर मी कुठल्याही टेस्टला सामोरा जायला तयार आहे. मी आजही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि उद्याही असेन. देशाला मी हे वचन देतो की मागे हटणार नाही” या आशयाची पोस्ट बृजभूषण सिंह यांनी लिहिली आहे.

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

शनिवारी काय म्हणाले होते बृजभूषण सिंह?

बृजभूषण शरण सिंह यांनी शनिवारी वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “मी एके दिवशी सांगितलं होतं की, मी कोणतही गैर कृत्य केलेलं नाही आणि त्याबाबत मला कोणतीही भिती नाही. एक दिवस मी तुमच्यासोबत भाऊ, मुलगा, काका सर्व नाती जोडू शकतो, तुमच्यासाठी कोणत्याही क्षणी मदतीला धावून येऊ शकतो, पण याचा अर्थ माझ्यावर केलेले आरोप बरोबर आहेत असं नाही. अजूनही मी सर्व गोष्टी सर्वांसमोर नाही बोलत आहे.”

कुस्तीपटूंची २८ दिवसांपासून निदर्शनं

कुस्तीपटू मागच्या २८ दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची त्यांची प्रमुख मागणी आहे. भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. बृजभूषण सिंह यांनी मात्र कुस्तीपटूंचे आरोप फेटाळले आहेत.