Wrestling Federation of India office is back to its old address Brij Bhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचं कार्यालय आता पुन्हा एकादा जुन्या पत्त्यावर हालवण्यात आलं आहे. हा जुना पत्ता म्हणजे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचं घर आहे. होय! भारतीय कुस्ती महासंघाचं कार्यालय पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंह यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ते अनेक वर्षे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचं लैंगिंक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिक, आंतरराष्ट्रीय ख्यातीची मल्ल विनेश फोगाट यांच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं होतं. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच कुस्ती महासंघाचं कार्यालय त्यांच्या घरातून स्थलांतरित करण्यात आलं होतं. आता ते कार्यालय पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंह यांचे घर २१, अशोका रोड दिल्ली येथे हालवण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर बृजभूषण शरण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी करावी लागली होती. त्यानंतर कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत त्यांनी त्यांचेच निकटवर्तीय संजय सिंह यांना उभं केलं. संजय सिंह यांनी ती निवडणूक जिंकली व ते आता कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. तर दुसऱ्या बाजूला बृजभूषण शरण सिंह यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नाही. मात्र, त्यांनी आता कुस्ती महासंघाचं कार्यालय दिल्लीतल्या हरी नगर येथून पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंहांच्या घरी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिंह यांनी कुस्ती महासंघावर पकड मिळवण्यास सुरुवात केली आहे.

A viral Kannada post about Bengaluru being closed to outsiders sparks intense online debate.
“…तर उत्तर भारतीयांसाठी बंगळुरू बंद”, सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद; नेमकं प्रकरण काय?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप
Accident
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव
Bengaluru Diwali Firecrackers accident
VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

बृजभूषण शरण सिंहांचा पुन्हा एकदा कुस्ती महासंघावर पकड मिळवण्याचा प्रयत्न?

इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलंआहे की कुस्ती महासंघाचं कार्यालय आता ज्या ठिकाणी हालवण्यात आलं आहे तिथे बृजभूषण शरण सिंह यांचं घर आहे. ते दिल्लीत असताना याच घरात राहतात. बृजभूषण शरण सिंहांचे पुत्र करण भूषण सिंह हे उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. महिला कुस्तीपटूंचे आरोप व आंदोलन, त्यानंतरचा राजीनामा, लोकसभेचं तिकीट न मिळणे व इतर कारणांमुळे बृजभूषण शरण सिंहांची पिछेहाट झाली असली तरी त्यांच्या कुटुंबाने राजकारणावरील पकड सैल होऊ दिलेली नाही. सध्या दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधातील लैंगिक शोषण प्रकरणावरील सुनावणी चालू आहे. त्यांच्याविरोधात मजबूत खटला उभा राहिला असला तरी कुस्ती महासंघाने बृजभूषण यांच्याबरोबरचे संबंध तसेच ठेवले आहेत. हे पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, बृजभूषण शरण सिंह म्हणाले, “भारतीय कुस्ती महासंघाचं कार्यालय कुठे असावं हे भारत सरकार ठरवू शकत नाही”. ते एएनआयशी बोलत होते.

Story img Loader