Wrestling Federation of India office is back to its old address Brij Bhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचं कार्यालय आता पुन्हा एकादा जुन्या पत्त्यावर हालवण्यात आलं आहे. हा जुना पत्ता म्हणजे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचं घर आहे. होय! भारतीय कुस्ती महासंघाचं कार्यालय पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंह यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ते अनेक वर्षे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचं लैंगिंक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिक, आंतरराष्ट्रीय ख्यातीची मल्ल विनेश फोगाट यांच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं होतं. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच कुस्ती महासंघाचं कार्यालय त्यांच्या घरातून स्थलांतरित करण्यात आलं होतं. आता ते कार्यालय पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंह यांचे घर २१, अशोका रोड दिल्ली येथे हालवण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा