दलिपसिंग राणा उर्फ ‘द ग्रेट खली’ याला बुधवारी उत्तराखंडमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेदरम्यान (WWE) गंभीर दुखापत झाली. त्याला उत्तराखंडच्या बृजलाल रूग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचारासाठी दाखल करण्यात आले. उत्तराखंडमधील गौलापार स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारताचा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन हरमन सिंह आणि मेक्सिकोचा हर्नांडेज यांच्यातील लढतीच्यावेळी हा प्रकार घडला. या सामन्यात हरमन सिंगने हर्नांडेजवर विजय मिळवला. विजयानंतर हरमन सिंह रिंगणात आनंद साजरा करत असताना अमेरिकेचा माईक नॉक्स आणि कॅनडाचा ब्रॉडी स्टील या दोघांनी रिंगणात घुसून हरमनला बेदम मारहाण केली. यानंतर या दोघांनी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या खलीला आव्हान दिले. खलीने हे आव्हान स्विकारत रिंगणात येऊन ब्रॉडी स्टील आणि माईक नॉक्सला मारहाण केली. खली नॉक्सला मारहाण करत असताना ब्रॉडी स्टीलने पाठीमागून येऊन खलीच्या डोक्यात खुर्ची घातली. यामध्ये खलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकारानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा