पीटीआय, बीजिंग

चीनच्या अध्यक्षपदी क्षी जिनिपग यांची रविवारी तिसऱ्यांदा निवड झाली. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदासाठी त्यांची निवड झाली. ते तहहयात चीनच्या सत्तेवर राहतील, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची विक्रमी कामगिरी करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाईल.

पक्षाच्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे, की रविवारी झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनातील पहिल्या पूर्ण सत्रात जिनिपग यांची पक्षाच्या विसाव्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. जिनिपग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात केंद्रीय समितीचे २०३ सदस्य आणि १६८ वैकल्पिक सदस्य उपस्थित होते. या अधिवेशनात जिनिपग यांची केंद्रीय सैन्य आयोगाचे (सीएमसी) अध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली.

चीनमधील ‘क्षी युग’ म्हणून जिनिपग यांची कारकीर्द ओळखली जाईल. आपल्या नव्या कारकीर्दीची पुन्हा सुरुवात करण्यासाठी जिनिपग स्थानिक व परदेशी प्रसारमाध्यमांसमोर रविवारी उपस्थित झाले. जिनिपग यांच्या आधी, माओंचा अपवाद वगळता, जिनिपग यांच्या आधी चीनच्या सर्व अध्यक्षांनी दहा वर्षांच्या कार्यकाळानंतर निवृत्त होण्याचा नियम पाळला होता. मात्र जिनिपग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याने हा संकेत संपुष्टात आला. जिनिपग २०१२ मध्ये प्रथम निवडून आले होते. त्यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ या वर्षी संपणार होता.

पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाणारे नेते पंतप्रधान ली क्विंग यांच्यासह अनेक उदारमतवादी नेते शनिवारी पक्षाच्या ३०० सदस्यीय केंद्रीय समितीत स्थान मिळवू शकले नाहीत. चीनच्या साम्यवादी पक्षाच्या पाच वर्षांतून एकदा होत असलेल्या महाअधिवेशनात त्यांची केंद्रीय समितीवर निवड झाली नाही. समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत २५ सदस्यीय राजकीय समितीची निवड करण्यात आली. या समितीने सात सदस्यीय स्थायी समितीची निवड केली. या स्थायी समितीने जिनिपग यांची पाच वर्षांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी सरचिटणीस म्हणून निवड केली. शनिवारी अपेक्षेनुसार जिनिपग यांची शनिवारी केंद्रीय समितीने निवड केली. त्यानंतर राजकीय व स्थायी समितीत त्यांची सहज निवड झाली. या महाअधिवेशनात पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून, तिची मूळ स्थिती पुन्हा लागू करण्यात आली. त्यानुसार जिनिपग यांचे निर्देशांचे पालन करणे सर्व पक्षसदस्यांसाठी बंधनकारक ठरणार आहे. त्यामुळे चीनचे नेते म्हणून जिनिपग अधिक प्रबळ झाले आहेत.

पक्षाच्या आठवडाभर चाललेल्या २० व्या महाअधिवेशनाचा समारोप शनिवारी नाटय़मय पद्धतीने झाला. प्रकृतीअस्वास्थ्याने ग्रस्त माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना चीनच्या ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’मधून (पार्लमेंट भवन) प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आले. ७९ वर्षीय हू यांनी दहा वर्षांपूर्वी २०१२ मध्ये जिनिपग यांच्याकडे सत्ता सोपवली होती. त्यामुळे तिसऱ्यांदा जिनिपग यांची निवड होत असताना हू जिंताओचे दर्शन हा विरोधाभास मानला जात आहे. मार्चमध्ये नवीन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र केंद्रीय प्रशासन मार्चमध्ये औपचारिकपणे पदभार स्वीकारेल.

हाती सर्वंकष सत्तासुत्रे!
राष्ट्राध्यक्ष, पक्षाचे नेते आणि लष्करी प्रमुख म्हणून जिनिपग यांचा सर्वात शक्तिमान नेता म्हणून उदय होणे आणि माओंच्या पावलावर पाऊल ठेवत ते या पदावर तहहयात कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे काही घटक धास्तावले आहेत. कारण हा एक पक्ष असलेला देश आता एक नेता असलेला बनला आहे. सर्वंकष सत्ता एकहाती एकवटली आहे.