बीजिंग : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधला. गेल्या १० वर्षांत आपण केलेल्या कामांचा कार्य अहवाल देताना भविष्यातील योजनांचीही त्यांनी चर्चा केली. पुढल्या आठवडय़ात पक्षाचे पंचवार्षिक अधिवेशन असून त्यावेळी जिनपिंग यांची अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड होणे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाच्या बैठकीला कम्युनिस्ट पक्षाचे ४०० ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. १६ ऑक्टोबरला पक्षाचे २०वे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मांडल्या जाणार असलेल्या ठरावांना बैठकीत अंतिम स्वरुप देण्यात आले. चीनमधील एकमेव पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या या अधिवेशनास मोठे महत्त्व असते. चीनमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळावर १० वर्षांची मर्यादा होती. मात्र २०१८मध्ये ही मर्यादा हटवण्यात आली. त्यामुळे आता अमर्याद काळासाठी पक्षाध्यक्षपदी राहण्याचा जिनपिंग यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या विक्रमी कार्यकाळाबरोबरच त्यांच्या अधिकारांमध्येही वाढ होणार असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xi jinping likely to re elected president of china again zws
Show comments