Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी आज दुसऱ्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या आपल्या ग्रँड इव्हेंटमध्ये कंपनीने Mi A2 आणि Mi A2 Lite हे दोन स्मार्टफोन सादर केले होते. आज दुपारी 12 वाजेपासून अमेझॉन आणि mi.com वरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. सेलमध्ये मर्यादित फोनचीच विक्री होईल, यानुसार जो पहिली नोंदणी करेल त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. 16 ऑगस्ट रोजी कंपनीने फोनचा पहिला सेल आयोजीत केला होता, त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आज दुसऱ्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.

या फोनच्या मागच्या बाजूला 20 आणि 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तर सेल्फीप्रेमींसाठी पुढील बाजूसही 20 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेलं व्हेरिअंटही असेल असं सांगण्यात येत आहे, मात्र या व्हेरिअंटला अद्याप उपलब्ध करण्यात आलेलं नाही.

ऑफर्स – 

हा फोन खरेदी केल्यास रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 4.5 टीबी अतिरिक्त डेटा देण्यात येत आहे. तसंच या फोनवर 2,200 रुपयांच्या इन्स्टंट कॅशबॅकची ऑफरही देण्यात आली आहे. याशिवाय एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 5 टक्के सूट आणि नो-कॉस्ट ईएमआय यांसारख्याही ऑफर्स आहेत.

स्पेसिफिकेशन –
डिस्प्ले : 5.99 इंच
प्रोसेसर : 1.8GHz ऑक्टाकोर
फ्रंट कॅमेरा : 20-मेगापिक्सल
रिजोल्युशन : 1080×2160 पिक्सल pixels
रॅम : 4GB
ओएस : Android 8.1 Oreo
स्टोरेज : 64GB / 128GB
रिअर कॅमेरा : 20-मेगापिक्सल
बॅटरी : 3000mAh