आंध्र प्रदेशच्या विभाजनावरून वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जनगमोहन रेड्डी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या आई आणि पक्षाच्या मानद अध्यक्षा वाय. एस. विजया यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जगन सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चंचलगुडा कारागृहात आहेत. जगन कडाप्पा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. तर त्यांच्या आईसुद्धा कडाप्पा जिल्ह्य़ातूनच  विधानसभेवर निवडून आल्या आहेत.  जगन यांच्या पक्षाचा आंध्र विभाजनाला विरोध आहे. त्यांच्या पक्षाच्या १७ आमदार आणि २ खासदारांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत. आता आमच्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत असे मेकपती राजमोहन रेड्डी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा