Yahya Sinwar : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ( Yahya Sinwar ) याला इस्रायलच्या लष्कराने ठार केलं आहे. गाझा पट्टीत जो एअर स्ट्राईक करण्यात आला त्यामध्ये तीन दहशतवाद्यांना मारल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. तसंच त्यापैकी एक याह्या सिनवार ( Yahya Sinwar ) होता असंही सांगितलं आहे. याह्या सिनवार ( Yahya Sinwar ) कोण होता आणि त्याच्या मृत्यूनंतर इस्रायलमध्ये जल्लोष का होतो आहे? आपण जाणून घेऊ.

याह्याला ठार केलं पण युद्ध संपलेलं नाही

७ ऑक्टोबरला जो नरसंहार झाला त्यासाठी जबाबदार असलेल्या याह्या सिनवारला ( Yahya Sinwar ) आम्ही ठार केलं आहे अशी माहिती इस्रायलचे परराष्ट्र मंत्री काट्ज यांनी म्हटल आहे. आम्ही ७ ऑक्टोबरचा हिशेब चुकता केला आहे पण अद्याप युद्ध संपलेलं नाही असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

salman khan life threat lawrence bishnoi gang
“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Tamannaah Bhatia Questioned By ED
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणींमध्ये वाढ, महादेव बेटिंग APP प्रकरणात ईडीकडून चौकशी
Canada police allegations
India-Canada Row: कॅनडाचा जळफळाट, लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेत भारतावर केले धक्कादायक आरोप
Kamala Harris US Election 2024
US Election 2024 : “तुम्ही कमला हॅरिस यांना मतदान करणार ना?”, अमेरिकेच्या निवडणुकीत मराठीतून आवाहन, प्रचारासाठी भारतीय एकवटले
Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray Hospitalized at Reliance Hospital for Angioplasty
Uddhav Thackeray Hospitalized : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…

याह्या सिनावारची २२ वर्षे तुरुंगात

याह्या सिनवारने ( Yahya Sinwar ) त्याच्या आयुष्याची २२ वर्षे तुरुंगात घालवली आहेत. १९८८ ते २०११ अशा प्रदीर्घा कालावधीत तो इस्रायलच्या तुरुंगात होता. त्यानंतर काही काळ त्याने अज्ञातवासात घालवला. त्यामुळे तो आणखी कट्टर झाला. तुरुंगात असताना त्याचा प्रभाव इतर कैद्यांवर होता. गैरवर्तन करणं, दादागिरी करणं, हेराफेरी करणं हे त्याच्या स्वभावात होतं. त्याच्याबाबत माहिती देणाऱ्या कैद्यांबाबत त्याने फक्त संशय आल्याने त्यांना शिक्षा देण्याचाही प्रयत्न केला. तसंच तुरुंगात असताना त्याने १६०० कैद्यांना उपोषण करायला लावलं होतं. हिब्रू या भाषेत त्याने प्राविण्य मिळवलं आहे. त्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सिनवारला गाझा पट्टीतल्या हमास या संघटनेच्या राजकीय सदस्यपदी निवडण्यात आलं होतं. २०१५ मध्ये सिनवारचं नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आलं. २०१७ पासून त्याने हमासचा म्होरक्या म्हणून काम केलं आहे.

याह्या सिनवारला कसाई असं का म्हटलं जायचं?

याह्या सिनवारला अनेक नावांनी ओळखलं जातं. त्याला कुणी हमासचा ओसामा बिन लादेन म्हणतात. तर कुणी खान युनिसचा जल्लाद. इस्रायलकडून त्याची तुलना हिटलरशी करण्यात येत होती. याह्या सिनवार इतका क्रूर होता की त्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांना तडफडवून मारलं आहे. त्यामुळेच त्याला कसाई असं संबोधलं जात होतं. लहान मुलांसमोर त्याने या हत्या केल्या होत्या. तसंच लहान मुलांना तो बंदुक कशी चालवायची हे शिकवत होता. त्याच्या प्रचंड क्रौर्यामुळे त्याला कसाई हे नाव पडलं. इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिजर्ड हेचट यांनी त्याला क्रौर्याचा भेसूर चेहरा असं म्हटलं होतं. तसंच चालता बोलता पण मेलेला माणूस त्याला काहीही दयामाया नाही असंही त्याचं वर्णन करण्यात आलं होतं. सिनेवारचा जन्म १९६२ मध्ये गाझाच्या एका शरणार्थी शिबीरात झाला होता. त्याला खान युनिसचा कसाई असंही म्हटलं जातं कारण तो खुलेआम हत्या करण्यासाठी कुप्रसिद्ध होता.

हे पण वाचा- Yahya Sinwar Killed : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार, IDF ने दिला दुजोरा; इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम लागणार?

२०१५ मध्ये जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत नाव

याह्या सिनवारला २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं. या घटनेच्या काही दिवस आधीच याह्याने फ्रान्सची संपती गोठवली होती. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत नाव आलं तरीही त्याचं क्रौर्य कमी झालं नाही. याह्या ८० च्या दशकाच्या शेवटी हमासमध्ये सहभागी जाला. तो तुरुंगात असताना त्याने त्याचं नेटवर्क तयार केलं होतं. इस्रायलचे दोन सैनिक आणि चार पॅलेस्टाईनी नागरिकांची हत्या या गुन्ह्यांखाली त्याला २२ वर्षांची शिक्षा झाली होती. तुरुंगात त्याने स्वतःचं नेटवर्क तयार केलं जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो क्रूरकर्मा बनला होता.

याह्या सिनवारचं क्रौर्य फारच भयंकर होतं. एकदा त्याने एका इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या संशय असलेल्या एका माणसाला जिवंत पुरलं होतं. कबरीचा खड्डा चमच्यांनी खोदण्याची ऑर्डर द्यायचा. या प्रकरणात त्याने ज्याला मारलं त्याच्या भावालाच चमच्यांच्या सहाय्याने त्याची कबर खणायला लावली होती.