Yahya Sinwar : इस्रायलच्या सैन्याने केलेल्या कारवाईत हमासचा म्होरक्या याह्या सिनवार १६ ऑक्टोबर रोजी मारला गेला. याह्या सिनवार ठार होण्याच्या आधीच्या काही क्षणाचा एक व्हिडीओ इस्रायलच्या लष्कराकडून शेअर करण्यात आला. त्यामध्ये तो गंभीर जखमी अवस्थेत एका उद्ध्वस्त घरामध्ये हातानिशी बसल्याचं दिसला होता. त्यानंतर त्याला ठार करण्यात आलं. दरम्यान, त्यानंतर याह्या सिनवार आणि त्याच्या कुटुंबाचाही एक व्हिडीओ इस्रायलकडून शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये याह्या सिनवार हा आपल्या पत्नी आणि मुलांसह एका बोगद्यात फिरताना दिसून आला होता. तसेच याह्या सिनवार आणि त्याची पत्नी काही वस्तू आणि पुरवठा घेऊन एका बोगद्यात जात असल्याचे दिसले.

एवढंच नाही तर त्या बोगद्यात याह्या सिनवार दीर्घ मुक्काम करण्याच्या तयारीत होता, असा दावा इस्रायलकडून करण्यात आला. हा व्हिडीओ ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्याच्या काही तासांपूर्वीचा असून याह्या सिनवार हा कशा पद्धतीने लपत होता, हे दाखवण्याचा प्रयत्न व्हिडीओतून करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा प्राणघातक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याच्या आधी याह्या सिनवार हा पत्नी आणि मुलांसह एका भूमिगत बोगद्यातून जात असल्याचं व्हिडीओत दिसून आलं.

Sudha Murty touches Javed Akhtar feet video viral
Video: मंचावर सुधा मूर्ती पडल्या जावेद अख्तर यांच्या पाया; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “संपूर्ण देश त्यांना…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Police Officer mixes ash in food for devotees Viral Video
Maha Kumbh 2025 : पोलिसाने महाकुंभमेळ्यातील भाविकांसाठी शिजवल्या जाणाऱ्या अन्नात कालवली राख; Video Viral झाला अन्…
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील लक्ष्मी व सरस्वतीने शेअर केला व्हिडीओ; सहकलाकारांच्या कमेंट्सने वेधले लक्ष
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Viral Photo
Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत
Sanjay Raut on Saif Ali Khan : “वैद्यकीय चमत्कार “, रुग्णालयातून ५ दिवसांत घरी परतलेल्या सैफबद्दल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “चाकू कितीही…”

हेही वाचा : Yahya Sinwar : याह्या सिनवार बोगद्यात लपला होता, तर पत्नीकडे दिसली २७ लाखांची बॅग; इस्रायलकडून Video शेअर

दरम्यान, याह्या सिनवार हा व्हिडीओमध्ये ज्या बंकरमध्ये दिसून आला होता. त्या बंकरमध्ये काय-काय होतं? याची माहिती आता समोर आली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, याह्या सिनवार राहत असलेल्या बंकरमध्ये युएन रेशन पुरवठा, लाखो डॉलर्स रोख रक्कम, स्वयंपाकघर, परफ्यूम, शॉवरसह आदी इतर सुविधांचा साठा होता. याह्या सिनवार हा या बंकरच्या आतमध्ये राहत होता. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यादरम्यान याह्या सिनवारने काही दिवस आधी कसे घालवले? हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. तसेच याह्या सिनवार हा बंकरच्या आतमध्ये राहत होता. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडीओ इस्रायली अधिकाऱ्यांकडून शेअर करण्यात आला आहे.

याह्या सिनवार होता ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड!

इस्रायलच्या हद्दीत गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून प्रवेश करत बेफाम कत्तल केली होती. घराघरात घुसून इस्रायली नागरिकांना ठार केलं होतं. प्रचंड दहशत निर्माण केली. रस्त्यावर मृतदेहांची जाहीर विटंबनाही केली. याह्या सिनवार हा याच हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्यामुळे त्याचा मृत्यू हा हमाससाठी मोठा धक्का मानला जातो.

याह्या अचानक सापडला आणि मारला गेला!

हमासचा म्होरक्या इतक्या सहज हाती लागेल याची इस्रायली लष्कराला कल्पनाही नव्हती. तो कुठे आहे याचा ठावठिकाणा लष्कराला माहिती नव्हता. त्याबाबत कोणतीही गुप्तचर यंत्रणेची माहिती लष्कराकडे नव्हती. नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असणाऱ्या पथकाला तो त्या घरात दिसला आणि त्याचा खात्मा करण्यात आला. पेट्रोलिंगच्या पथकाला हमासचे तीन दहशतवादी दिसले. त्यातच याह्या एक होता. चकमकीदरम्यान याह्यानं एका इमारतीमध्ये आसरा घेतला. पण तिथे इस्रायलचे ड्रोन पोहोचले आणि त्याला ठार करण्यात आलं.

Story img Loader