१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनला पकडून आणणारे रॉचे माजी अधिकारी बी.रमन याकूबच्या फाशीच्या विरोधात होते, असा गौप्यस्फोट एका इंग्रजी वेबपोर्टलने केला आहे. केंद्रीय सचिवालयात अतिरिक्त सचिव राहिलेले रॉचे माजी अधिकारी बी.रमन यांनी २००७ साली इंग्रजी वेबपोर्टलसाठी लेख लिहीला होता. त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार, नेपाळ पोलिसांच्या मदतीने याकूबला काठमांडू विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर सरकारी विमानातून त्याला नवी दिल्लीत आणण्यात आले. बॉम्बस्फोटासंदर्भातील चौकशीसाठी पुढे याकूबला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, याकूबला फाशीची शिक्षा द्यावी का हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे, असे वैयक्तिक मत असल्याचे रमण यांनी लेखात मांडले आहे. तसेच शरण येण्याआधी याकूबने जे केले त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे होती. पण अटक झाल्यानंतर त्याने तपास यंत्रणांना सर्व सहकार्य केले. त्याने तपास यंत्रणांना चौकशी आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली त्यामुळे त्याला एवढी मोठी शिक्षा देण्याआधी थोडा विचार केला जाऊ शकतो, असेही लेखात रमण यांनी म्हटले आहे.
२०१३ साली रमण यांचे निधन झाले. रमण यांनी लिहीलेला लेख तेव्हा प्रकाशित करण्यात आला नव्हता. मात्र, रमण यांच्या भावाच्या परवानगीने हा लेख प्रकाशित करत असल्याचे वेबपोर्टलने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा