यासिन भटकळ हा इंडियन मुजाहिदीनचा अत्यंत खतरनाक असा दहशतवादी आहे. बॉम्ब पेरण्यापासून ते बॉम्बस्फोट घडवण्यापर्यंतची कामगिरी असो वा दहशतवादी हल्ल्याचे नियोजन असो किंवा मग दहशतवादी घडवण्याचे काम असो, यासिन या प्रत्येक कामात तरबेज आहे. त्यामुळेच त्याची अटक हे आपल्या तपासयंत्रणांचे सर्वात मोठे यश असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी व्यक्त केली आहे.
गृहसचिवपदावरून नुकतेच निवृत्त झालेल्या सिंह यांनी यासिनच्या अटकेबद्दल सर्वच तपासयंत्रणांचे अभिनंदन केले आहे. यासिन यापूर्वी दोनदा तपासयंत्रणांच्या तावडीतून निसटला होता. त्याला एकदा कोलकाता पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, त्याची ओळख पटवण्यात यंत्रणांना यश आले नाही. त्यावेळी तो निसटला होता. दुसऱ्यांदा तपासयंत्रणाच्या कचाटय़ात यासिन अलगद अडकला होता. मात्र, त्याही वेळी त्याने हातावर तुरी दिलीच. यावेळी मात्र सर्व तपासयंत्रणा गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या मागावार होत्या. त्यामुळेच त्याला पकडणे शक्य झाले आहे. तो अत्यंत खतरनाक असा दहशतवादी असून त्याच्याकडून देशातील अनेक गुन्हय़ांचे तसेच इतरही दहशतवाद्यांचे धागेदोरे मिळू शकत असल्याचे सिंह म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा