अटकेत असलेला इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासिन भटकळ याने या वर्षी हैदराबादेत बॉम्बस्फोट घडविल्याचे कबूल केल़े हे स्फोट घडविण्यासाठी पाकिस्तानातील सूत्रधाराकडून सूचना मिळाल्याचेही त्याने सांगितले आह़े
हैदराबादमधील दिलसुखनगर येथे विविध ठिकाणी पेरण्यासाठी आपण एका माणसाला स्फोटके पुरविल्याचेही भटकळ याने चौकशीत सांगितल्याचे समजते. परदेशी कंपन्यांनी भारतातून विस्तार करण्यापासून माघार घ्यावी, यासाठी आपल्याला पाकिस्तानातील सूत्रधाराने हैदराबादेत स्फोट घडविण्याच्या सूचना दिल्याचेही त्याने सांगितल़े पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्ब पेरताना त्याने गर्दी असणाऱ्या दुकानाची निवड केल्याचे त्याने सांगितल़े
दिलसुखनगर येथे २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत १७ लोकांचा बळी गेला होता; तर १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा