इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकळच्या एनआयए कोठडीत मंगळवारी चार दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय दिल्लीतील न्यायालयाने दिला. यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांना मंगळवारी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत दिल्लीतील न्यायालयात आणण्यात आले. 
यासिनच्या एनआयए कोठडीत २१ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यासिन भटकळ आणि असदुल्ला अख्तर यांना बिहारमधील नेपाळच्या सीमेवरून २९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. देशात २००६ पासून पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली आणि सूरतमध्ये झालेले वेगवेगळे बॉम्बस्फोट यासिन भटकळ आणि त्याच्या साथीदारांनीच घडवून आणले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा