जेव्हा भारतीय सुरक्षा यंत्रणांनी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक यासिन भटकळ याला गेल्या महिन्यामध्ये भारत-नेपाळ सिमेवर ताब्यात घेतले त्या वेळी दहशतवादाशी लढण्यात देश किती यशस्वी झाला यावर थोडी शंका होती. मात्र, यासिन भटकळ या दहावीतून शाळा सोडून दहशतवादाचा मार्ग धरलेल्या दहशतवाद्यांने तपास पथकासमोर तोंड उघडल्यावर देश दहशतवादाशी लढण्यात किती यशस्वी झाला आहे ते समजते. 
कराचीत जायला ‘व्हिसा’ लागत नव्हता – यासिन भटकळ
‘भटकळ’ या कर्नाटक मधील छोट्या शहरातून येऊन २००७ पासून देशभर कसे बॉम्बस्फोट घडवून निष्पाप लोकांना मारण्यात आले याचा खुलासा आता  यासिन भटकळ करू लागला आहे. दुबईहून परतल्यावर २००७ मध्ये यासिन भटकळ उडूप्पी गावाजवळ कुप्पा येथील एका फार्महाऊसवर राहात होता. यासिन याने तपास पथकाकडे नवनवीन खुलासे उघड करण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये इंडियन मुजाहिद्दीन कसे बॉम्ब पेरत होती व कसे स्फोट घडवून आणले गेले याची माहिती तपास पथकांना मिळू लागली आहे.
यासिन भटकळला हैदराबादमध्ये न्यायालयीन कोठडी

‘अल-इ-हादिथ’ किंवा इस्लामच्या कडव्या धार्मिक शिकवणीवर विश्वास ठेवणारा यासिन तपासपथकांना सांगतो एक दिवस मुस्लिम सैनिक संपूर्ण भारताचा ताबा घेवून या ठिकाणी इस्लामी कायद्याची स्थापना करण्यात य़शस्वी होतील.   
यासिन याने तपास पथकांना इडियन मुजाहिद्दीनने घडवून आणलेल्या महत्वाच्या बाँब  स्फोटांची माहिती दिली:
हैद्राबाद स्फोट
२५ ऑगस्ट २००७
यासिन कुप्पामध्ये राहात होता तेव्हा इंडियन मुजाहिद्दीनचा दुसरा सहसंस्थापक रियाझ भटकळ याने ऑगस्ट २००७ मध्ये त्याची भेट घेतली. या भेटीमध्ये रियाझने हैद्राबादमध्ये स्फोट घडवण्यासाठी यासिनला तीन ‘आयईडी’ (शक्तिशाली बाँब) तयार करायला सांगितले होते.
“स्फोटानंतर जास्तीत जास्त हाणी होण्यासाठी मी बॉम्बमध्ये बॉल बेअरींगचा वापर केला होता,” असे  यासिन म्हणाला.
यासिन याने सांगितल्याप्रमाणे रियाझ याने बॉम्बमध्ये जिलेटीन व टायमर बसवला. एका साध्या पिशवीमध्ये तिनही बॉम्ब ठेवण्यात आले. रियाझने नंतर एक प्रवासी पिशवीची सोय केली. एका खासगी बसने ते दोघे मंगळूरहून हैद्राबादला आले. एका हैद्राबादच्या महामार्गाजवळील एका दुकानामध्ये स्फोटकांची पिशवी ठेवली. त्या ठिकाणी फरार असलेल्या मोहसिन चौधरीचे भाऊ अनिक आणि अकबर इस्माईल यांनी स्फोटकांची पिशवी ताब्यात घेतली.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा