‘ग्रामहित’च्या तळमळीचा जागतिक गौरव!; श्वेता महल्ले यांच्या यशाने जिल्ह्यचा लौकिक जगभर

नितीन पखाले

Vishwas Ugle captured motherly moment on camera with little Tara lovingly cuddling her calf
ताडोबातील “छोटी तारा” च्या मातृत्वाचा क्षण…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
huge investment by nine companies in pune
पुण्यातील तळेगाव दाभाडेत ह्युंदाई स्टीलसह नऊ कंपन्यांची मोठी गुंतवणूक! रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण
mumbai crime news in marathi
गुजरातमधील व्यापाऱ्याचे ६८ लाख रुपये घेऊन नोकराचे पलायन
Coldplay tickets, Memes and reels Coldplay,
‘कोल्ड प्ले’च्या तिकिटांवरून समाजमाध्यमांवर मीम्स आणि रिल्सचा पाऊस; क्षणार्धात तिकिटांचे आरक्षण, संकेतस्थळ ठप्प
Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) येथील पंकज व श्वेता महल्ले या शेतकरी दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ या ‘स्टार्टअप’ने ‘फोर्ब्स आशिया’च्या यादीत स्थान मिळवल्यानंतर आता ग्रामहितच्या संस्थापक संचालक श्वेता पंकज महल्ले (ठाकरे) यांनी अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या ‘फोर्ब्स’च्या मुखपृष्ठावर स्थान मिळवले आहे. श्वेता यांच्या या यशाने जिल्ह्याचा लौकिक जगभर झाला आहे. ‘फोर्ब्स’चा आशिया पॅसिफिक भागातील अकरा क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देणारा डिसेंबरचा अंक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ‘फोर्ब्स’च्या या अंकाच्या मुखपृष्ठावर अन्य चार तरुण व्यावसायिकांसोबत श्वेता यांचे छायाचित्र झळकले आहे. ‘फोर्ब्स’ हे मासिक वित्त, उद्योग, गुंतवणूक आणि विपणन, तंत्रज्ञान, संप्रेशन, विज्ञान, राजकारण, कायदा आदी विषयांवर अंक प्रकाशित करते.

‘फोर्ब्स’ने दखल घ्यावी यासाठी या क्षेत्रात कार्य करणारे तरुण कायम धडपडत असतात. सामाजिक स्तरावरील समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने व कल्पकतेने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची ‘फोर्ब्स’कडून दखल घेतली जाते. कंपनीची कामगिरी जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना ‘फोर्ब्स’कडून प्रोत्साहन मिळते. यावर्षी ‘फोर्ब्स’च्या यादीत निवड व्हावी म्हणून ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत ग्रामहितने स्थान मिळवले. या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणे ही गौरवास्पद कामगिरी समजली जाते. श्वेता यांनी पती पंकज यांच्यासमवेत ग्रामहित ही शेतकऱ्यांसाठी शेतमाल विपणन क्षेत्रात काम करणारी कंपनी स्थापन करून अवघ्या दोन वर्षांत जागतिक स्तरावर मानांकन मिळवल्याने जिल्ह्याचाही लौकिक वाढला आहे.

कॉर्पोरेट जीवनशैली सोडून गाव गाठले

‘ग्रामहित’ ही शेतमाल विपणन व्यवस्थेतील ‘व्हिलेज ट्रेड सेंटर’ आहे. करोना काळात पंकज महल्ले या तरुणाने कॉर्पोरेट जीवनशैली सोडून पत्नी श्वेतासह थेट गाव गाठले. पंकज व श्वेता दोघेही उच्चशिक्षित आहेत. गावात परतण्यापूर्वी ते दोघेही कॉर्पोरेट कंपनीत मोठय़ा हुद्यावर कार्यरत होते. मात्र करोनामुळे लागलेली टाळेबंदी आणि या काळात शेतकरी बांधवांची होत असलेली आर्थिक घुसमट, फरफट त्यांनी जवळून अनुभवली व दोघेही गावी परतले.