२०२१ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. अशावेळी नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये प्रवेश करताना मागील वर्षाकडे वळून पाहिलं तर अशा अनेक घटना आहेत ज्यांनी जगाला हादरवलं. यात जगाची महासत्ता असं बिरूद मिरवणाऱ्या अमेरिकेत झालेलं सत्तांतर आणि त्याआधी थेट वॉशिंग्टन डीसीत झालेल्या दंगली, स्फोट आणि एकूणच हिंसाचारापासून दहशतवादी संघटना तालिबानचा अफगाणिस्तानमधील उदय अशा अनेक घटनांचा समावेश आहे. या अशाच जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या, जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वर्ष २०२१ मधील महत्त्वाच्या १० घडामोडींचा आढावा.

१. जागतिक महासत्ता अमेरिकेच्या संसदेवर हल्ला आणि हिंसाचार

२०२१ मध्ये जगाची महासत्ता आणि प्रगल्भ लोकशाही मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संसदेवर तत्कालीन मावळते राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनीच हल्ला केला. यामुळे जगभरात प्रचंड खळबळ उडाली होती. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या उद्देशाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच
book review kashmir under 370 a personal history by j and ks former director general of police
बुकमार्क : काश्मीरचे भूतभविष्य…
abhijeet kelkar post for CM devendra Fadnavis
“एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…

या वेळी हिंसाचारात अनेक लोकांना आपला जीवही गमवावा लागला. आधी ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल अमान्य करत घोटाळ्याचा आरोप केला. मात्र, अखेर अमेरिकी संसदेने बायडेन-कमला हॅरिस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःचा पराभव मान्य केला. विशेष म्हणजे हिंसा भडकावणारे ट्वीट केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट देखील निलंबित करण्यात आलं.

२. अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून शस्त्रांच्या बळावर सत्तापालट

अफगाणिस्तानमधील कट्टरतावादी संघटना तालिबानने अमेरिकन सैन्याने माघारीची घोषणा करताच डोकं वर काढलं आणि अफगाण सैन्याला पराभूत करत सत्तापालट केला. यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये शरिया या धार्मिक कायद्याची अंमलबजावणी करत महिलांवर अनेक निर्बंध लादले.

३. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहीम

अमेरिकेने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून एकूण १,२३,००० लोकांना बाहेर काढले आहे. यामध्ये अमेरिकन नागरिकांसह अमेरिकीच्या सहकारी मित्र देश आणि अफगाण नागरिकांचा समावेश होता. ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहीम ठरली. या काळात अफगाणमधील तालिबानी राजवटीच्या भीतीने मिळेल त्या मार्गाने जीवाचा आटापिटा करत आपल्या मुलाबाळांसह स्थलांतर करणाऱ्या नागरिकांच्या फोटोंनी जग हेलावलं होतं. यासह अमेरिकेची २० वर्षांपासून अफगाणिस्तानातील लष्करी उपस्थितीही संपली.

४. इजिप्तमधील सुएझ कालव्यात जहाज अडकल्यानं जागतिक व्यापार ठप्प

मार्च २०२१ मध्ये इजिप्तमधील सुएझ कालव्यात एक महाकाय मालवाहू जहाज अडकलं आणि जगभरातील व्यापार ठप्प झाला. युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानंतर अखेर ५ दिवसांनंतर हे जहाज काढण्यात आणि कालव्यातील आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग सुरू करण्यात यश आलं. यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाला.

पनामाचा ध्वज असलेले एव्हर गिव्हन नावाचं मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात ते जहाज अडकून पडलं, त्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती. हे अवाढव्य जहाज कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक अडकून पडलं होतं. मंगळवारपासून या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पाच दिवसांनंतर म्हणजेच रविवारी सायंकाळी या प्रयत्नांना यश आलं. रॉयटर्सने केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्याने या जहाजाला बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.

५. करोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळे जगात खळबळ

करोना संसर्गाने २०२१ मध्ये जगभरात पुन्हा डेल्टा व्हॅरिएंटच्या संसर्गामुळे खळबळ उडाली. वेगाने संसर्ग करणाऱ्या डेल्टा व्हॅरिएंटमुळे करोनाच्या पुढील लाटेला चालना मिळाली. इतकंच नाही, तर याच २०२१ मध्ये ओमायक्रॉन या आणखी एका नव्या करोना विषाणूने जगाची काळजी वाढवली. एकूणच डिसेंबर २०१९ मध्ये वुहानमध्ये सुरू झालेल्या करोनाची तीव्रता कमी होऊन गाडी रूळावर येत असतानाच २०२१ मध्ये करोनाच्या नव्या विषाणूंनी नवं आव्हान उभं केलं.

६. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये तुंबळ युद्ध

२०२१ मध्ये इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. इस्रायल आणि पॅलेस्टाइन हा संघर्ष मागील अनेक वर्षांपासून चालत आला आहे. मात्र, यावेळी जुन्या जेरुसलेम शहराजवळ दोन्ही बाजूने हल्ले झाले. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लीम आणि अर्मेनियन लोकांसाठी महत्वाचं धार्मिक स्थळ असणाऱ्या या ठिकाणाला जवळजवळ युद्धभूमीचं स्वरुप आलं होतं. यावेळी हमासने इस्रायलवर १६०० हून अधिक रॉकेट्स डागल्याचा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला होता. यापैकी ४०० रॉकेट्स गाझा पट्टीमध्येच पडली. इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम या प्रणालीने सुमारे १०० रॉकेट्स आकाशातच निकामी केले.

या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमधील ६०० ठिकाणांवर हल्ला केल्याचं असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं. दुसरीकडे गाझा पट्टीमध्ये तळ ठोकून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनाही इस्रायलवर रॉकेट्सच्या माध्यमातून हल्ले सुरुच ठेवले. गाझामध्ये इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. याशिवाय हजारो लोक जखमी झाले. सरीकडे दक्षिण इस्रायलमध्येही पॅलेस्टिनी कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला. यात लहान मुलांचाही संमावेश होता.

७. भारतातील शेतकरी आंदोलनाचे जगभरात पडसाद, रिहाना पाठोपाठ ग्रेटा थनबर्गकडून पाठिंबा

मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन जगभरात चर्चेचा विषय ठरलं. विशेष म्हणजे दिल्लीत केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र निर्माण झालं होतं. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं.

शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले, रस्त्यावर मोठे खड्डे करण्यात आले, कॉक्रिटच्या भिंती तयार करण्यात आल्या. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना आणि जागतिक पातळीवर तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली होती.

ग्रेटानं ट्विट करत म्हटलं, “भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत.”

रिहानानंही शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. आपण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत का नाहीत? असा सवाल तिने ट्विटद्वारे केला होता. अखेर २०२१ मध्येच शेतकरी आंदोलनासमोर झुकत मोदी सरकारने आपले महत्त्वकांक्षी ३ कृषी कायदे मागे घेतले.

८. पेगसॅस हेरगिरीप्रकरणी व्हॉट्सअॅप आणि अॅपलकडून एनएसओवर खटले, भारतातही पडसाद

२०२१ मध्ये इस्रायलच्या गुप्तहेर तंत्रज्ञान संस्था एनएसओने विकसित केलेल्या पेगॅसस या सॉफ्टवेअरचा वापर करून झालेला हेरगिरीचा मुद्दाही चांगलाच गाजला. जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाइल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यानंतर व्हॉटसअ‍ॅप या अमेरिकेच्या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयातही खेचलंय. यासोबत अॅपलने देखील खटला दाखल केला आहे.

दरम्यान, पेगॅससचा वापर करून हेरगिरीच्या प्रकरणांमध्ये ३०० हून अधिक भारतीय मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. हे मोबाइल क्रमांक मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी वापरलेले आहेत, असे शोधपत्रकारितेच्या ‘प्रोजेक्ट पिगॅसस’मधून उघड झालं आहे.

९. अंतराळ संशोधन ते इलेक्ट्रिक कार निर्मितीत अग्रणी, एलन मस्क ‘पर्सन ऑफ द इयर २०२१’

जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे. एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत. मॅगझिननुसार, एलन मस्क यांची निवड त्यांच्या अंतराळातील कामासाठी तसेच इलेक्ट्रिक कारसाठी करण्यात आली आहे. “पर्सन ऑफ द इयर एखाद्या व्यक्तीचा प्रभाव प्रतिबिंबित करतो आणि पृथ्वीवरील किंवा पृथ्वीच्या बाहेरील जीवनावर छाप पाडणारे कमी लोक आहेत. एलन मस्क हे २०२१ मध्ये आपल्या समाजातील बदलाचे सर्वात मोठे उदाहरण आहेत.”, असे गौरवोद्गार टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थनल यांनी काढले.

टेस्लाचे बाजारमूल्य यावर्षी एक ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ७६ लाख कोटी रुपये) पर्यंत वाढले आहे. कंपनीचे मूल्य आता फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. टेस्ला दरवर्षी लाखो मोटारींचे उत्पादन करते आणि पुरवठा साखळीतही प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा चांगलं यश संपादन केलं आहे.

१०. विश्वसुंदरी स्पर्धेत २१ वर्षांनंतर भारतीय युवतीला किताब

इस्रायलमधील इलात शहरात झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेत (मिस युनिर्व्हस) भारताच्या हरनाज संधू हिने विश्वसुंदरीचा किताब पटकावला. ती मूळची चंडीगडची आहे. ७९ देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेची विजेता म्हणून संधूला घोषित करण्यात आले, तर पॅराग्वेची नादिया फेरिराला द्वितीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या लालेला म्स्वानो हिला तृतीय स्थान मिळाले.

Story img Loader