Political Year Ender 2024 : नव्या वर्षाला अर्थात २०२५ ला सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. खरं तर नव्या वर्षाकडून आपल्या प्रत्येकालाच खूप अपेक्षा असतात. नव्या वर्षाची सुरुवात चांगली व्हावी असं सर्वांनाच वाटतं. त्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षांचं सर्वजण धुमधडाक्यात स्वागत करत असतात. मात्र, नव्या वर्षाचं स्वागत करताना, सरत्या वर्षाला (२०२४ ) निरोप देत असताना एक नजर वर्षभरात घडलेल्या घटनांकडे टाकायला हवी.

२०२४ या वर्षात भारतात कोणकोणत्या नेत्यांची सर्वाधिक चर्चा झाली याची आपण उजळणी करणार आहोत.

baba siddque and sitharam yechury
Year Ender 2024 : सीताराम येचुरी ते बाबा सिद्दिकी, ‘या’ भारतीय राजकारण्यांनी २०२४ मध्ये घेतला अखेरचा श्वास!
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Suvendu Adhikari Contai Cooperative Bank polls
Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेसकडून घरच्या मैदानावर धुव्वा, सुवेंदु अधिकारी यांच्या अडचणी वाढणार?
dropped from cabinet by BJP is shocking for Ravindra Chavan
रवींद्र चव्हाण यांना भाजपचा धक्का?
आम आदमी पक्षाने 'त्या' १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : आम आदमी पार्टीने ‘त्या’ १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं?
Baba Vanga Predictions 2025 in Marathi
Baba Vanga Predictions 2025 : २०२५मध्ये जगावर भूकंपाचे संकट, भारतावर प्रभाव होणार? बाबा वेगाचं काळजाचं थरकाप उडवणार भाकीत
Mallikarjun Kharge criticizes Prime Minister Narendra Modi
भूतकाळात नव्हे वर्तमानात वावरा! खरगे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला
no MLA from Solapur district in the new cabinet post of the Mahayuti
महायुतीचे पाच आमदार असूनही सोलापूरला मंत्रिपदाची हुलकावणी

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०२४ हे वर्ष अनेक राजकीय घडामोडींनी भरलं होतं. पाच वर्षांनंतर देशात लोकसभेची निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ही निवडणूक जिंकली. मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने २४० जागा जिंकल्या, तर एनडीएने मिळून २९३ जागा जिंकत भारतात सरकार स्थापन केलं आहे.

२. राहुल गांधी

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने यंदाची लोकसभा निवडणूक लढवली व तब्बल ९९ जागा जिंकल्या. काँग्रेसच्या खासदारांची संख्या आता दुप्पट झाली आहे. तसेच राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभर फिरले, लोकसंपर्क वाढवला. ते स्वतः वायनाड व अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले.

हे ही वाचा >> Year Ender 2024: बांगलादेशपासून अमेरिकेपर्यंत राजकीय उलथापालथी; २०२४ या वर्षात जगभरात काय काय घडलं?

३. एस. जयशंकर

२०२४ मध्ये, भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावला. अमेरिका, रशिया, चीन व युरोपियन युनियनसारख्या प्रमुख जागतिक शक्तींशी संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं. यूएन व जी-२० च्या मंचावर भारताची भूमिका मांडली. रशिया-युक्रेन युद्ध, इंडो-पॅसिफिक तणाव, जागतिक आर्थिक अस्थिरता, इस्रायल-हमास, इस्रायल हेझबोला, इस्रायल-इराण युद्धांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

४. प्रियांका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील २०२४ मध्ये माध्यमं व जनतेचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवली. प्रियांका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक जिंकून संसदेत दाखल झाल्या आहेत. त्यांनी तब्बल ६.२२ लाख मंतं मिळवली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार सत्यन मोकेरी यांचा तब्बल चार लाख मतांनी पराभव केला. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी भाऊ राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून देशभर प्रचार केला.

हे ही वाचा >> Crime News : दर महिन्याला निश्चित पगार, प्रवास भत्ता आणि बरंच काही… मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश

५. एन. चंद्राबाबू नायडू

२०२४ हे वर्ष तेलुगू देशम पार्टीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडूंसाठी खास होतं. त्यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणात जोरदार कमबॅक करत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. केंद्रातील एनडीएच्या सरकारला बहुमताचा टप्पा ओलांडण्यास नायडूंचा हातभार लागला आहे. तसेच त्यांनी आंध्र प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकून मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे.

६. देवेंद्र फडणवीस

२०१९ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल १०५ जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये जोरदार कमबॅक केलं. त्यांच्या पक्षाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १३२ जागा जिंकल्या. तसेच शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. फडणवीस पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.

७. मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे गेल्या काही वर्षांपासून भारताच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. गेल्या ११ वर्षांपासून देशात हिंदुत्ववादी पक्षांचं सरकार आहे. या पक्षांना सत्तेच्या खुर्चीत बसवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रमुख भूमिका राहिली आहे. त्यामुळे अर्थातच संघाचे प्रमुख असलेल्या भागवत यांचा दबदबा पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा >> South Korea Plane Crash Video : दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेचं नेमकं कारण काय? लँडिंगवेळी स्फोट झाला त्या क्षणाचा Video आला समोर

८. आतिशी मार्लेना

अनेक महिने तुरुंगवास व जामिनावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर देशाच्या राजधानीची जबाबदारी आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी मार्लेना यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

९. ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यावरील त्यांचं नियंत्रण कायम ठेवलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख गेल्या काही वर्षांपासून भारताच्या राजकारणातील प्रभावी व्यक्ती म्हणून समोर आल्या आहेत.

१०.स्मृती इराणी

भाजपा नेत्या स्मृती इराणी या लोकसभा निवडणुकीत (अमेठी मतदारसंघ)पराभूत झाल्या असल्या तरी राजकारणावरील त्यांचा प्रभाव कायम आहे. त्या भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत करण्यासाठी काम करत आहेत.

Story img Loader