e

Year-ender 2024: भारतासह जगभरातील निम्म्या लोकसंख्येने या वर्षांत मतदान केले. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीकोनातून हे वर्ष महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर मध्यपूर्वेतील संघर्ष, युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध याचीही बरीच चर्चा या वर्षात झाली. जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेत निवडणुकीच्या माध्यमातून सत्तांतर झाले. तर बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना जनआंदोलनामुळे सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सीरियातही बशर अल-असद यांना त्यांच्या कुटुंबाची पाच दशकांची सत्ता सोडून पळ काढावा लागला. यापैकीच जगभरातील वर्ष २०२४ मधील काही मोठ्या घडामोडींवर नजर टाकू.

Raj Thackeray and Uddhav Thackeray Came Together
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Prajakta Mali Suresh Dhas and BJP
Prajakta Mali vs Suresh Dhas: प्राजक्ता माळीच्या विषयावरून आमदार सुरेश धस भाजपामध्ये एकाकी; नेत्यांनी कान टोचले
Sanjay Raut slams Raj Thackeray (1)
Sanjay Raut: ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका
Sharad Pawar
Sharad Pawar : “मला दिवसभर उभं करून…”, शरद पवारांनी सांगितलं पक्षफुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात काय घडलेलं?
uddhav thackeray sharad pawar (3)
Maharashtra Assembly Election : “शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी…”, शिवसैनिकांचा गंभीर आरोप; म्हणाले, “मविआचा प्रचार करणार नाही”
Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
H1B visa loksatta vishleshan
आधी H-1B व्हिसाचे विरोधक, आता समर्थक… ट्रम्प यांच्या भूमिकेतील बदल कशामुळे? हजारो भारतीयांना होणार फायदा?

१. इराण – इस्रायल संघर्ष

२०२३ मध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्ष उडाला होता. या युद्धाला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोवरच इराण आणि इस्रायल यांच्यातही संघर्ष पेटला. इराणमधील हेजबोला संघटनेने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर इस्रायलनेही त्याचे सडेतोड उत्तर दिले. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबला असला तरी पूर्णपणे शांता

हे वाचा >> Political Year Ender 2024 : कुठे निवडणुका तर कुठे राजकीय भूकंप, देशात २०२४ मध्ये कोणत्या पाच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या!

२. बांगलादेशमध्ये सत्तांतर

भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये मोठी उलथापालथ झाली. निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान झालेल्या शेख हसीना यांना स्वतःच्या देशातूनच पळ काढावा लागला. शेख हसीना पुन्हा निवडून आल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची व्याप्ती देशभर पसरली, ज्यातून नंतर हिंसाचार भडकला. हिंसाचाराचे लोण पंतप्रधान निवासस्थानापर्यंत पोहोचल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशमधून काढता पाय घेतला आणि त्या भारताच्या आश्रयाला आल्या.

बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्याचार सुरू झाल्याच्या बातम्या पुढे येऊ लागल्या. याविरोधात भारतासह आता देशभरातून आवाज उचलला जात आहे.

३. भारत-कॅनडामध्ये संघर्ष

कॅनडामध्ये मागच्या वर्षी खलीस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर कॅनडा आणि भारत यांच्यामधील द्वीपक्षीय संबंधात तणाव निर्माण झाला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी या हत्येबद्दल भारतावर गंभीर आरोप केले होते. यानंतर भारताने कॅनडाचे उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना तर देशाबाहेर जायला सांगितलेच, त्याशिवाय भारताचे कॅनडामधील उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलाविण्यात आले.

या वादाचेही पदसाद जगभरात उमटले. अमेरिकेने या वादात उडी घेतली. कॅनडात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यानंतर द्वीपक्षीय संबंधात काही सुधार होणार का? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा >> Year Ender Elections in 2024 : २०२४ ठरलं निवडणुकींचं वर्ष! जगभरात कुठे कोण जिंकलं, कोण हरलं?

४. सीरियामध्ये सत्तांतर

२०२४ च्या शेवटच्या महिन्यात सीरियाच्या बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचे आणि अध्यक्ष बशर अल असाद यांची राजवट उलथवून टाकली. बंडखोर दमास्कसमध्ये शिरत असताना लष्कराने आधीच माघार घेतली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असाद यांनी दमास्कसमधून पळ काढला. सशस्त्र बंडानंतर राष्ट्राध्यक्ष बशर असद यांना देश सोडून पळावे लागले. यामुळे असद घराण्याची ५० वर्षांची एकाधिकारशाही एका रात्रीत संपुष्टात आली. दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर इराणच्या दूतावासामध्ये घुसले आणि तिथे मोडतोड केली. या बंडामुळे असद यांना पाठिंबा देणाऱ्या रशिया आणि इराणला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. त्याच वेळी इस्रायलला मात्र आपली एक सीमा सुरक्षित करण्याची या निमित्ताने संधी मिळाली आहे. तर तुर्कीयेही सीरियावर आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.

५. दक्षिण कोरियात आणीबाणी

दक्षिण कोरियातही मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी ३ डिसेंबर रोजी आणीबाणी जाहीर केली, पार्लमेंटने ती काही तासांत मागे घेतली. त्यानंतर आता यून येओल यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी सुरू झाली आहे.

उत्तर कोरियाच्या समर्थक कम्युनिस्ट शक्ती देशात कार्यरत असून त्या पार्लमेंटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आणीबाणी लागू करून या शक्तींचे उच्चाटन करण्याचा आणि संवैधानिक लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करत असल्याचा दावा यून येओल यांनी ‘मार्शल लॉ’ची घोषणा करताना केला. मात्र, याची दुसरी बाजूही आहे. दक्षिण कोरियाचे पुढील अंदाजपत्रक कसे असावे यावरून त्यांचा विरोधी पक्षांबरोबर संघर्ष सुरू आहे. त्याशिवाय तीन वरिष्ठ अभियोक्त्यांवर गैरप्रकाराचे आरोप करून त्यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

Story img Loader