Political Year Ender 2024 : आता नव्या वर्षाला अर्थात २०२५ ला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. खरं तर नव्या वर्षाकडून आपल्या प्रत्येकालाच खूप अपेक्षा असतात. नव्या वर्षाची सुरुवात चांगली व्हावी असं सर्वांनाच वाटतं. त्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षांचं सर्वजण धुमधडाक्यात स्वागत करत असतात. मात्र, नव्या वर्षाचं स्वागत करताना एकदा सरत्या वर्षाला (२०२४ ) निरोप देत असताना एक नजर मागे वर्षभरात घडलेल्या घटनांकडे टाकायला हवी. त्यामुळे २०२४ या वर्षांत भारतात कोणत्या मोठ्या पाच राजकीय घडामोडी घडल्या? हे थोडक्यात जाणून घेऊयात.

नितीश कुमार यांची पुन्हा भाजपाबरोबर युती

२०२४ या वर्षभरात बिहारच्या राजकारणातही मोठ्या घडामोडी घडल्या. नितीश कुमार यांनी आरजेडी बरोबरची आघाडी तोडत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपाच्या साथीने नितीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं. त्यामुळे आरजेडी पक्षाला विरोधी बाकावर बसावं लागलं. त्यामुळे २०२४ हे वर्ष बिहारच्या राजकारणात चर्चेत राहिलं.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?

हेही वाचा : Year Ender Elections in 2024 : २०२४ ठरलं निवडणुकींचं वर्ष! जगभरात कुठे कोण जिंकलं, कोण हरलं?

हेमंत सोरेन यांना अटक आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

२०२४ या वर्षात झारखंडमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केल्यामुळे त्यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढंच नाही तर राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना अटक देखील झाली होती. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेस आघाडीने चंपाई सोरेन यांची सरकारमधील विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली होती. मात्र, हेमंत सोरेन यांना काही महिन्यांनी जामीन मिळाल्यानंतर पुन्हा हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री झाले होते.

अरविंद केजरीवाल यांना अटक

२०२४ या वर्षात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना मार्चमध्ये ईडीकडून अटक झाली होती. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, तरीही अरविंद केजरीवाल ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यानंतर अखेर २१ मार्ज रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री पदावर असताना एखाद्या व्यक्तीला अटक होण्याची ही पहिलीच वेळ होती.

झारखंडची निवडणूक आणि निकाल

झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव करत बहुमत मिळवलं आणि झारखंडमध्ये पुन्हा एकदा झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार स्थापन झालं. हेमंत सोरेन हे चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले.

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल

२०२४ याच वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर महायुतीत मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत साशंकता होती. एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात होतं. तसेच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचीही चर्चा होती. पण अखेर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Story img Loader