Year Ender Elections Analysis 2024 : २०२४ हे निवडणुकीचे वर्ष होते. या वर्षभरात जगभरातील किमान ६४ देश आणि जगातील जवळपास अर्ध्या लोकसंख्येने वेगवेगळ्या निवडणुकीत मतदान केले. २०२४ मध्ये पार पडलेल्या या निवडणुकींचे जगावर दूरगामी परिणाम होणार आहेत. याची छाप फक्त मतदान करणाऱ्या मतदारांच्या आयुष्यावरच नाही तर याबरोबरच जगभरातील राजकीय परिस्थितीवर देखील पडणार आहे.

अमेरिकेतली अध्यक्ष पदाची निवडणूक

२०२४ मध्ये जगाने पाहिलेली सर्वात महत्त्वाची निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यात पार पडलेली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होती. या जागतिक राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली आणि ट्रम्प दुसर्‍यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
Image of the BSE building.
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट
baba siddque and sitharam yechury
Year Ender 2024 : सीताराम येचुरी ते बाबा सिद्दिकी, ‘या’ भारतीय राजकारण्यांनी २०२४ मध्ये घेतला अखेरचा श्वास!
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?

यूके सार्वत्रिक निवडणूक

२०२४ मध्ये पार पडलेल्या यूके सार्वत्रिक निवडणुकीची जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. ही निवडणूक जुलै २०२४ मध्ये घेण्यात आली होती. ज्यामध्ये युकेमध्ये विरोधी बाकावर असलेल्या मजूर पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत मोठी झेप घेतली आहे. ४०० हून अधिक जागांवर विजय प्राप्त करून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर, गेल्या १४ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षाला म्हणजे कॉन्झव्हेर्टिव्ह पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मजूर पक्षाने कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वात युकेमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.

लोकसभा निवडणूक २०२४

भारतात १९ एप्रिलपासून पुढे सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ९६.८८ कोटी पेक्षा जास्त पात्र मतदारांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले. मतदारांची संख्या लक्षात घेतली तर मानवी इतिहासातील आत्तापर्यंतची ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने या निवडणुकीत ऐतिहासिक तिसर्‍यांदा सत्ता राखली. असे असले तरी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.

हेही वाचा>> Year Ender 2024 : बिल्किस बानो, चाइल्ड पोर्नोग्राफी ते बुलडोझर कारवाई… सर्वोच्च न्यायालयाचे २०२४ मधील महत्त्वाचे निकाल

पाकिस्तान सार्वत्रिक निवडणूक

भारताचा शेजारी पाकिस्तान येथे देखील २०२४ मध्ये १६ व्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य निवडण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मतदान पर पडले. पण यामध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ला निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात आली नव्हीत, ज्यामुळे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत लष्कराने कथित हेराफेरी केल्यानंतरही इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष हेच सर्वात मोठा गट म्हणून उदयास आले. मात्र, त्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली नाही आणि शेवटच्या क्षणी पीएमएल-एन, पीपीपी, एमक्यूएम आणि इतर पक्षांच्या युतीला परवानगी मिळाली.

बांग्लादेश निवडणूक

२०२४ मध्ये पाकिस्तानबरोबरच बांगलादेशात देखील निवडणूक पार पडली. या वर्षात पहिल्यांदा निवडणूक झालेल्या देशांमध्ये बांगलादेश एक होता. बांगलादेश येथे ७ जानेवारी रोजी पार पडलेल्या निडणुकीत मतदान पूर्णपणे एकांगी झाल्याचे पाहायला मिळाले. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीग पक्षाने सलग चौथ्यांदा ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीत १० टक्क्यांपेक्षा कमी पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

येथील प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीने मतदानावर बहिष्कार टाकला होता. निवडणूक जिंकूनही, हसीना जास्त काळ सत्तेवर टिकून राहू शकल्या नाहीत आणि लोकांनी आंदोलन पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना ऑगस्टमध्ये देश सोडून पळून जावे लागले.

हेही वाचा>> VIDEO : “काय मग विशेष?”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रत्नागिरीतील व्यक्तीशी कुवैतमध्ये साधला मराठीतून संवाद!

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष आणि संसदेच्या निवडणुका

२०२४ मध्ये भारताचा आणखी एक शेजारी देश म्हणजेच श्रीलंकेतही राष्ट्राध्यक्ष पद आणि संसदेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये मार्क्सवादी नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि त्यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) किंवा जाथिका जना बालावेगया (Jathika Jana Balawegaya) पक्षाने १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत मोठा विजय मिळवला.

Story img Loader