गरीब मुस्लीम तरुणींना विवाहासाठी शासनाकडून ५० हजारांचा साहाय्यता निधी देण्याच्या योजनेत सर्वधर्मीय तरुणींचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी़ एस़ येडियुरप्पा यांनी रान उठवले आह़े  बेळगावमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात येडियुरप्पा यांनी या मागणीसाठी सोमवारी रात्रीपासून धरणे धरले आह़े  मंगळवारीही त्यांचे आंदोलन सुरू होत़े
सिद्धरामैया शासन जोपर्यंत शादी भाग्य योजनेच्या व्याप्तीत सर्वधर्मीयांना सामावून घेत नाही, तोपर्यंत सभागृहातील मोकळ्या जागेत बसून माझे धरणे सुरूच ठेवेन, असे येडियुरप्पा यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितल़े  सभागृहाचे कामकाज सुरू असतानाही त्यांचे धरणे सुरूच होत़े
येडियुरप्पा यांनी याआधी २६ दिवस बंगळुरू येथे धरणे आंदोलन केल़े  मात्र शासनाने त्याला दाद न दिल्याने बेळगावच्या विधानसभा अधिवेशनातच त्यांनी धरणे सुरू केले आह़े  सोमवारी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरही त्यांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिला़  इतक्या चिवट आंदोलनानंतरही सिद्धरामैया किंवा त्यांच्या कॅबिनेटमधील कोणत्याही सहकाऱ्याने त्यांची भेटही घेतली नसल्याचे येडियुरप्पा यांचे म्हणणे आह़े  तर या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आह़े

Story img Loader