कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपला रामराम करून स्वत:चा पक्ष स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे बूमरँग होईल आणि राज्यातील त्यांच्या राजकीय कारकीर्दीला त्यामुळे ग्रहण लागेल, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी म्हटले आहे.
राज्यात प्रादेशिक पक्षांना विशेष महत्त्व नसल्याने कर्नाटक जनता पार्टीला भवितव्य नाही. आपण सत्तेवर नाही, या नैराश्यातून येडियुरप्पा यांनी भाजपचा त्याग केला आहे. ते भाजपमध्ये असते तर त्यांना सन्माननीय स्थान मिळविता आले असते, असेही गौडा म्हणाले.येडियुरप्पा यांच्या पक्षत्यागाचा पक्षाला निश्चितच फटका बसेल, परंतु तो क्षणिक असेल, असेही गौडा म्हणाले.   

Story img Loader