गेल्याा काही महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्लीत भारताच्या काही महिला कुस्तीपटू सातत्याने आंदोलन करत आहेत. महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटूंकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात या आंदोलनाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात महिला कुस्तीपटू आक्रमक भूमिका मांडत असताना पतंजलीचे योगगुरू रामदेव बाबा हे महिला कुस्तीपटूंच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.

राजस्थानच्या भिलवाडा भागामध्ये तीन दिवसीय योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदेव बाबांना माध्यम प्रतिनिधींनी दिल्लीतील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत विचारणा केली. यावेळी उत्तर देताना रामदेव बाबांनी ब्रिजभूषण सिह यांच्यावर हल्लाबोल केला.

Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Image Of Rahul And Priyanka Gandhi.
Priyanka Gandhi : “मी त्यांची बहीण, असे कृत्य…”, राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; प्रियांका गांधी यांची पहिली प्रतिक्रीया
Marathi actor subodh bhave talks about marriage
“लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”
What Sharad Pawar Said About Chhagan Bhujbal ?
Sharad Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…”
Milind Gawali
“डब्यामध्ये तिळाचे लाडू होते आणि एक चिठ्ठी…”, प्रेमपत्राचा किस्सा सांगत मिलिंद गवळी म्हणाले, “ती चिठ्ठी आईला…”
children afraid of father parenting tips
समुपदेशन : बाबांची भीती वाटतेय?

स्वतःची तुलना प्रभू रामांशी, डोनाल्ड ट्रम्पचं उदाहरण देत ब्रिजभूषण सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “विनेश फोगाट…”

“देशाचे कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर व्यभिचार, लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ही फार लाजिरवाणी बाब आहे’, असं रामदेव बाबा यावेळी म्हणाले. “अशा व्यक्तीला तातडीने अटक करून तुरुंगात टाकायला हवं. तो रोज आपल्या आई-बहिणींविषयी, मुलींविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहे. हे निषेधार्ह आहे. पाप आहे”, असंही रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

तीन महिन्यांपूर्वी या महिला कुस्तीपटू आणि त्यांना पाठिंबा देणारे पुरुष कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले होते. एक आठवड्याहून जास्त काळ आंदोलन चालल्यानंतर अखेर सरकारने यासंदर्भात समिती नेमून चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचं पाहून पुन्हा एकदा महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Story img Loader