बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय योगा दिन गिनेस बुकमध्ये नोंदविण्यासाठी आयुष मंत्रालय कामाला लागले असून यासाठी पस्तीस ते चाळीस हजार लोक सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गिनेस बुकमध्ये हा कार्यक्रम नोंदविण्यासाठी त्यांच्या सर्व अटी व नियम पाळण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये २१ जूनला सकाळी ७ वाजता योगाला सुरुवात करण्यात येणार असून हा योगा पस्तीस मिनिटे चालणार आहे. यामध्ये विविध आसने करण्यात येणार आहेत. एवढय़ा मोठय़ा कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान उपस्थिती लावणार आहेत. यामुळे या आंतरराष्ट्रीय योगा दिनाकडे फक्त देशभरातूनच नव्हे तर जगाच्याही नजरा खिळल्या आहेत. हा दिवस तब्बल १९० देशांतील २५० शहरांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात पस्तीस हजार आसने ठेवण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक महिना आधीपासून तयारी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते ९ जून रोजी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

Story img Loader