संघर्षग्रस्त येमेनवगळता आंतरराष्ट्रीय योग दिन १९२ देशांमध्ये साजरा करण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
मंत्रिमंडळाची बैठक संपताच सदस्यांना भारतात आणि जगभरात साजऱ्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देण्यात आली.
भारतीय दूतावास नसलेला येमेनवगळता १९२ देशांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला, असे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. जगातील ४४ हून अधिक इस्लामी देशांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला, असेही ते म्हणाले.
दरम्यान, रक्षाबंधनाचा उत्सवही मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबत रविशंकर प्रसाद आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

Story img Loader