Sex Racket अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या एका महिलेने तिची आपबिती सांगितली आहे. ‘द सन’ च्या वृत्तानुसार ग्रेगोरियन बिव्होलारु या योग शिकवण्याचा दावा करणाऱ्या प्रमुखाने पीडित महिलेला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं. ही घटना ब्रिटनमधली आहे. या प्रकरणी बिव्होलारुवर बलात्कारासह इतर फौजदारी गुन्हे केल्याचाही आरोप आहे. तसंच नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याला अटक करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान या सेक्स रॅकेमध्ये अडलकलेल्या पीडित महिलेने अध्यात्माच्या नावाखाली तिला कसं फसवण्यात आलं आणि सेक्स रॅकेटमध्ये कसं ओढण्यात आलं हे सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिलेने काय सांगितलं?

या महिलेने सांगितलं की ती लंडन या ठिकाणी शिक्षिका होण्यासाठी आली होती. ती एका योगा सेंटरमध्ये योग शिकण्यासाठी गेली. त्यानंतर तिला या सगळ्या सेक्स रॅकेटमध्ये अडकवलं गेलं. ‘सेक्स कॅम गर्ल’ म्हणून तिला तिच्या इच्छेविरोधातली कामं करावी लागली आणि तिचा लैंगिक छळ करण्यात आला असं या संदर्भातला जो अहवाल आला आहे त्यात नमूद करण्यात आलं आहे. ही महिला २०१७ मध्ये शिक्षिका म्हणून नोकरी शोधण्यासाठी लंडन या ठिकाणी गेली होती. त्यावेळी ती तारा योगा केंद्र या योगा केंद्रात योग शिकण्यासाठी जाऊ लागली. या महिलेच्या संदर्भातला जो अहवाल समोर आला आहे त्यात पीडितेने असा दावा केला आहे की बिव्होलारु हा पृथ्वीवरचा देव असून त्याच्याशी शरीर संबंध ठेवल्याने अध्यात्माची कवाडं खुली होतात अशी तिची समजूत करुन देण्यात आली होती. या महिलेचं लैंगिक शोषण करण्याआधी तिचं ‘ब्रेन वॉश’ करण्यात आलं. तिला हे पटवून देण्यात आलं की तुझं शोषण होत नाही तर तुला अध्यात्मिक जागृती मिळवून देण्यासाठी हे सगळं चाललं आहे.

बिव्होलारु योग शिकवण्याच्या नावाखाली करत होता लैंगिक छळ आणि शोषण

या महिलेने सांगितलं ब्रिटनमधल्या त्या योग गुरुने माझा लैंगिक छळ केला. ग्रेगोरियन बिव्होलारु याचा हात योग शिकवण्यात कुणीही धरु शकत नाही. तो उत्तम योग शिक्षक आहे असं वगैरे सांगण्यात आलं होतं. या महिलेने सांगितलं की जे काही घडलं तो अनुभव खूपच वेदनादायी होता. जे काही माझ्यासह तो करत होता ते मला करायची इच्छा नव्हती. मात्र मी कसल्याश्या प्रभावाखाली होते त्यातून सगळं होत गेलं. असं या महिलेने द सनला सांगितलं. ब्रिटनच्या या महिलेने असंही सांगितलं की तो माझं लैंगिक शोषण करत होता. एक वेळ अशीही आली होती की त्याने सांगितलं की तुझ्यातली कामेच्छा संपली आहे.

या महिलेने ती या सगळ्यात कशी अडकली तेदेखील सांगितलं

पीडित महिलेने असंही सांगितलं काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये एका योग शिबीरात प्रवेश घेतल्यानंतरच या सगळ्याची सुरुवात झाली होती. मी इंग्रजी विषयातलं शिक्षण घेतलं होतं, शिक्षिकेची पदवी घेतली होती आणि लंडनमध्ये नोकरी शोधण्यासाठी आले होते असंही या महिलेने सांगितलं. रोमानियनं वंशाच्या बिव्होलारुने तिला योग शिकवतो म्हणून जाळ्यात ओढलं.

१ हजार कुमारीकांसह शय्यासोबत करण्याची बिव्होलारुची इच्छा

या महिलेने असंही सांगितलं की १ हजार कुमारीकांसह शय्यासोबत करण्याची या भोंदू गुरुची इच्छा होती. मला त्या रॅकेटचा भाग होण्यासाठी भाग पाडलं गेलं. द पॉलॅरिटी रिट्रीट या कोर्सच्या नावाखालीही सदर महिलेचं शोषण करण्यात आल्याचं तिने द सन ला सांगितलं. स्त्री आणि पुरुष यांच्या गरजा भिन्न भिन्न असतात. ती उर्जा वेगळी करुन त्यातले आकर्षण वाढवायचं या अनुषंगाने हा कोर्स आखण्यात आला होता. मात्र यातही महिलांचं शोषण केलं जात होतं असंही सदर महिलेने सांगितलं. या कोर्सचा एक भाग म्हणून ज्या स्त्रिया आणि पुरुष आले होते त्यांना वेगळं वेगळं बसवण्यात आलं. थोडेफार योग प्रकार घेतल्यानंतर महिलांनी सेक्सी कसं दिसलं पाहिजे, पुरुषांना आकर्षित कसं केलं पाहिजे या सगळ्या चर्चा सुरु झाल्या. तसंच एका गाण्यावर लैंगिक हावभाव करुन नृत्य करा असं आम्हाला सांगण्यात आलं. २०१८ मध्ये हे सगळं घडलं होतं. ती या सगळ्या शोषणाची सुरुवात होती असंही या महिलेने सांगितलं.

योग शिक्षणाच्या नावाखाली सेक्स रॅकेट

या ठिकाणी योग प्रशिक्षणाच्या नावाखाली जे काही होतं ते सगळंच अश्लील आणि लैंगिक शोषणाच्या दिशेने जाणारंच होतं. त्या ठिकाणी महिला आणि पुरुष अंतर्वस्त्रांमध्येच नाचत होते. बिव्होलारु याच्याजवळ माझ्यासह काही महिला नाचत गेल्या तेव्हा तो आम्हाला विचित्र नजरेने न्याहळत होता. २०१९ मधलाही अनुभव या महिलेने सांगितला आहे. ती म्हणाली की तिला हे सांगण्यात आलं की आज तुला बिव्होलारु भेटणार आहे आणि दीक्षा देणार आहे. त्याच दरम्यान या महिलेला समजलं की बिव्होलारुला अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात सहा वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. १ हजार कुमारिका मुलींसह शय्यासोबत करायची म्हणजे अध्यात्माची उच्च पातळी गाठता येईल असा बिव्होलारुचा विश्वास होता असंही या महिलेने सांगितलं आणि ब्रिटनमधलं हे सेक्स रॅकेट उघड केलं. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga guru vowed to bed 1000 virgins woman exposes yoga centre descent into sex cult in uk scj