पीटीआय, श्रीनगर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जग योगाकडे जागतिक हिताचा शक्तिशाली घटक म्हणून पाहत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगितले.पंतप्रधान सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधानांनी दल सरोवराच्या नयनरम्य काठावरील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्राची निवड केली. पंतप्रधानांनी सांगितले की, ‘‘योग केवळ ज्ञानच नाही, तर एक विज्ञान आहे. जेव्हा लोक योगाबद्दल बोलतात, त्यांच्यापैकी बहुतेकांना वाटते की हा एक आध्यात्मिक प्रवास आहे. ईश्वर, अल्ला, गॉड यांच्या शोधाचा हा प्रवास आहे… आध्यात्मिक प्रवास बाजूला ठेवा, जो नंतर कधीही होऊ शकतो. सध्या तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित करा, त्यासाठी योग महत्त्वाचे आहेत.’’

दल सरोवरच्या काठावरील खुल्या जागेत पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी पहाटे मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम बंदिस्त जागेत ठेवण्यात आला. या वेळी पंतप्रधानांनी विविध योगासने केली. त्यांच्यासमवेत काश्मीरमधील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. अधिक पर्यटकांना आकर्षित करून जम्मू व काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची क्षमता आहे यावरही पंतप्रधानांनी जोर दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga is a powerful factor of global interest statement by prime minister modi amy
Show comments