रोज वीस मिनिटे योगासने केल्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते असा दावा एका भारतीय संशोधकाने केला आहे. प्रामुख्याने हठयोगात मेंदूचे कार्य सुधारत असून मेंदूचे शरीरावरील नियंत्रणही चांगले राहते. तुमची एकाग्रता वाढते व माहिती ग्रहण करण्याची क्षमता वाढून नवीन माहितीची योग्य प्रकारे वापर करण्यास उत्तेजन मिळते, असाही दावा करण्यात आला आहे.
इलिनॉईस विद्यापीठातील नेहा गोथे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांवर प्रयोग केला त्यात एका गटाला एरोबिक व्यायाम देण्यात आला तर दुसऱ्या गटाला योगासनांचा सराव करण्यास सांगण्यात आले. यावेळी नमुना निवडीत तरूण, तरुणी व पदवीधर नसलेली मुलेही होती. गोथे यांच्या मते योग हे प्राचीन विज्ञान आहे व तो जगण्याचा एक मार्ग आहे. शारीरिक हालचालींची लयबद्धता त्यातून कळते व श्वासावर नियंत्रण व ध्यानधारणा यामुळे मन शांत होते. यात तुमची ध्यानक्रिया सुधारते. वीस मिनिटे योगासने केल्याने तुमच्या शरीराची बसण्याची स्थिती सुधारते. स्नायू मोकळे होतात व श्वास नियंत्रित होतो. खोल श्वसन व ध्यानधारणेने बरेच फायदे होतात. या प्रयोगात सामील असलेल्यांत जे एरोबिक व्यायाम करीत होते ते रोज ट्रीडमीलवर २० मिनिटे जॉगिंग व चालण्याचा व्यायम करत होते.
प्रत्येकाचा ट्रिडमीलवरचा योग ठराविक होता व हृदयाचे ठोके ६० ते ७० टक्के अधिक होते, या परिस्थितीत आकलनशक्ती सुधारते व इतर चांगले परिणाम घडतात असे सांगितले जात होते त्यामुळे त्यांना या स्थितीत व्यायाम करण्यास सांगण्यात आले होते.गोथे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या असे लक्षात आले की, एरोबिक व्यायामापेक्षा योगासनांनी माणसाच्या प्रतिक्षिप्त क्रिया व आकलन शक्ती यात जास्त सुधारणा दिसून आली, स्मरणशक्ती सुधारली, शरीरावरील नियंत्रण सुधारले.

फायदे
* एरोबिकच्या तुलनेत योगासनांनी मेंदूचे कार्य जास्त सुधारते
* आकलनशक्तीत फरक पडतो
* माहिती संस्करण पटकन होते
* नवीन माहिती ग्रहणाची क्षमता वाढते
* स्मरणशक्ती सुधारते

Story img Loader