योगविषयक अभ्यासक्रमामुळे आपल्या मुलांच्या मनावर हिंदू धर्मातील प्राचीन धर्मश्रद्धांचा पगडा पडेल, अशी भीती अमेरिकेतील काही पालकांनी व्यक्त केली असून यामुळे धार्मिक वाद निर्माण झाला आहे.
येथील पॉल एक सेंट्रल एलिमेंटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात योग विषयाचा समावेश आहे. त्याबाबत एका स्थानिक दबाव गटाने चेतविल्यामुळे काही पालकांनी या अभ्यासक्रमाला आक्षेप घेतला. अध्र्या तासाच्या या दैनंदिन अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात परधर्मशिक्षण बिंबवले जात असल्याचा पालक संघटनेचा आरोप आहे. भारतीय योगप्रशिक्षक कृष्ण पट्टाभी जॉयस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या जॉयस फाउंडेशनतर्फे या प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्यामुळेही धार्मिक शिक्षणाच्या आरोपाला जोर येत आहे. चर्चनेही यावर बराच ऊहापोह केला असून, या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मनात हिंदू धर्मश्रद्धा बिंबवल्या जातील अशी भीती चर्चनी व्यक्त केली आहे.

Story img Loader