Yoga Teacher : प्रेम प्रकरणातून एका योग शिक्षकाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. कारण आधी त्याचं अपहरण झालं, त्यानंतर त्याचे हात पाय बांधून त्या योग शिक्षकाला जिवंत गाडण्यात आलं. पोलिसांना घटना घडल्यानंतर तीन महिन्यांनी मृतदेह सापडला आहे. या धक्कादायक घटनेने रोहतक हादरलं आहे.

कुठे घडली ही घटना?

हरियाणातल्या रोहतक या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. जगदीप झझ्जर हा योग शिक्षक रोहतकच्या मांडोठी गावाचा रहिवासी होता. डिसेंबर महिन्यात त्याचं अपहरण झाल्यानंतर १० दिवसांनी त्याचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. बाबा मस्तनाथ विद्यापीठात जगदीप योग शिक्षक होता. रोहतकपासून ६१ किलोमीटर अंतरावरच्या चरखी दादरी गावाजवळ सात फुटांचा खड्डा करण्यात आला आणि त्यात जयदीपला जिवंत गाडण्यात आलं. योग शिक्षक जयदीपचं अपहरण झालं आहे हे समजून पोलीस त्याला तीन महिने शोधत होते. पण तो सापडला नाही. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

२४ मार्चला काय घडलं?

२४ मार्चला म्हणजे या योग शिक्षकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी पोलिसांन त्याचा मृतदेह सापडला. हा मृतदेह चरखी दादरी गावाजवळ सात फूट खोल खड्ड्यात सापडला. पोलीस तीन महिने जगदीप बेपत्ता असल्याचं समजून त्याला शोधत होते. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. २४ डिसेंबरला त्याचं अपहरण झालं होतं. त्यानंतर २४ मार्चला त्याचा मृतदेह सापडला. आरोपींनी जगदीपला मारहाण केली आणि त्याचे हात पाय बांधून त्याला जिवंत गाडलं.

जयदीपची हत्या का करण्यात आली?

२४ डिसेंबरला जगदीपचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर दोन आरोपींनी त्याला मारहाण केली. त्याच्या तोंडावर पट्टी लावली. जगदीप ज्या ठिकाणी भाडे तत्त्वावर राहात होता तिथे एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. हे या महिलेच्या पतीला समजलं. ज्यानंतर त्याने या योग शिक्षकाला मारहाण केली आणि त्याची अशा प्रकारे हत्या केली. या ठिकाणी सात फुटांचा जो खड्डा खणला जात होता तो बोअरवेलसाठी खणत आहोत असं या माणसाने सांगितलं होतं. त्यानंतर या खड्ड्यात त्यांनी जगदीपला जिवंत गाडलं.

दोन आरोपींना अटक करण्यात आली

जगदीपच्या या हत्या प्रकरणात पोलिसांनी हरीदप आणि धर्मपाल नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. यांचे काही साथीदारही या हत्या प्रकरणात सहभागी आहेत. पोलिसांनी प्रत्येक पैलू तपासण्यास सुरुवात केली आणि मग या आरोपींपर्यंत पोहचले आहेत. फोन कॉल्सचे डिटेल्स समजल्यानंतर सगळा प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितलं की इतर दोन आरोपींनाही लवकरच अटक होईल. तसंच जो मृतदेह आढळून आला आहे त्याचं शवविच्छेदनही कऱण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.