Yogi Adityanath destroyed Brahmin leadership says Randeep Surjewala : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला हरियाणात ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, आज (३० सप्टेंबर) रणदीप सुरजेवाला यांनी एका ब्राह्मण संमेलनाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीवर व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सुरजेवाला यांनी भाजपावर ते ब्राह्मणवरोधी असल्याचा आरोप केला. भाजपा व योगी सरकार ब्राह्मणांवर दडपशाही करत असल्याचाही आरोप केला. सुरजेवाला म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये ब्राह्मणांवर अत्याचार होत आहे”. हरियाणा व उत्तर प्रदेशचं उदाहरण देत सुरजेवाला म्हणाले, “या राज्यांमधील ब्राह्मणांचं नेतृत्व संपवलं जात आहे”.

रणदीप सुरजेवाला म्हणाले, “हरियाणात ब्राह्मण समाजावर अत्याचार झाले आहेत. आपल्या शेजारील राज्य उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात ठिकठिकाणी ब्राह्मणांवर अत्याचार झाले. उत्तर प्रदशमधील ब्राह्मण नेतृत्वाला काय झलंय? भाजपाचं उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण नेतृत्व कुठे आहे? योगी सरकारने उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण नेतृत्व संपुष्टात आणलं आहे”.

हे ही वाचा >> भगत सिंग निर्दोष होते! पाकिस्तानी वकिलाची ११ वर्षांपासून कायदेशीर लढाई; लाहोरमधील चौकाला नाव देण्यासाठी संघर्ष, पण…

…म्हणून भाजपाने उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण नेतृत्व संपवलं : सुरजेवाला

काँग्रेस नेते म्हणाले, “भाजपाने एकेका ब्राह्मण नेत्याला निवडून मारलं. ब्राह्मण नेत्यांना मारूनच योगी आदित्यनाथांनी भाजपामधील त्यांची राजकीय उंची वाढवली आहे. भाजपाच्या लोकांनी उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण नेतृत्वाला नाकारलं आहे. ब्राह्मण नेतृत्व त्यांनी संपवलं आहे. याचं कारण सर्वांना माहिती आहे. उत्तर प्रदेश हा देशातील सर्वात मोठा प्रांत आहे. देशाला याच प्रांतातून नेतृत्व लाभत आलं आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना राजकारणात जिवंत ठेवायचं असेल तर ब्राह्मण समाज व त्यांचं नेतृत्व संपवावं लागेल. त्यांना मारल्यानंतरचं अजय सिंह बिश्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांची राजकारणातील उंची वाढेल, हाच विचार करून भाजपाने ब्राह्मणांना संपवलं”.

हे ही वाचा >> CJI Chandrachud : “Yeah म्हणायला हे कॉफी शॉप नाही”, सरन्यायाधीश चंद्रचुडांनी वकिलाला झापलं; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

भाजपाकडून जशास तसं प्रत्युत्तर

सुरजेवालांच्या टीकेवर केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काही वेळापूर्वी बेगुसरायमध्ये गिरीराज सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष व सुरजेवाला मुस्लिमांसाठी प्राणांची आहुती देण्यास तयार आहेत. ते नेहमीच मुसलमानांबद्दल बोलत असतात. आज अचानक त्यांना हिंदूंची व ब्राह्मणांची आठवण कशी काय आली? निवडणूक आल्यामुळे त्यांनी त्यांचा चेहरा बदलला आहे”.