उत्तर प्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता राज्यामध्ये सत्तास्थापनाच्या घडामोडींना वेग येताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवणारे योगी आदित्यनाथ होळीच्या आधीच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ (Yogi Adityanath Oath) घेण्याची दाट शक्यता आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

योगी आदित्यनाथ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत होळीच्या आधी म्हणजेच १५ मार्च रोजी पदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहू शकतात असंही सांगितलं जात आहे. याशिवाय भाजपाने अन्य मोठे नेतेही योगींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे योगी हे उत्तर प्रदेशचे पाहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत.

Jitendra Awhad on Ajit Pawar
Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Yogi Adityanath Death Threat
Yogi Adityanath Death Threat : ‘१० दिवसांत राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी यांच्यासारखा शेवट करू’; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “२३ नोव्हेंबरला राज्यात बॉम्ब फुटणार”, मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीला इशारा
Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
Mallikarjun Kharge marathi news
Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
pm Narendra modi Maharashtra
PM Narendra Modi: मोदींच्या सभांचा ८ नोव्हेंबरपासून धडाका
What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

नक्की वाचा >> Election Results: ‘हा २०२४ चा कौल’ म्हणणाऱ्या मोदींना प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले “साहेबांना हे ठाऊक…”

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर योगींच्या शपथविधीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. योगी आदित्यनाथ हे होळीच्याआधीच शपथविधीचा कार्यक्रम उरकून लवकरात लवकर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ इच्छितात असं सांगण्यात येत आहे.

मोदी, शाह यांच्यासोबतच भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला हजर राहतील असं सांगितलं जातंय. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २५५ जागांवार भाजपाने विजय मिळवला आहे. ४०३ जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेमधील बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. त्यामुळे भाजपा लवकरच सत्तास्थापनेसाठी दावा करुन शपथविधीचा कार्यक्रम उरकून घेईल असं सांगितलं जातंय.

नक्की वाचा >> Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचा शपथविधी होळी आधीच करण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. १७ आणि १८ मार्चला होळी आणि रंगपंचमीचा उत्सव आहे. त्यानंतर १९ मार्च रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकींसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळेच शपथविधी हा होळीच्या आधीच होणार असल्याचं सांगितलं जातंय.

नक्की वाचा >> Election Results: पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेना म्हणते, “माकडांच्या…”

सध्या जी चर्चा झालीय त्यानुसार १५ मार्च म्हणजेच मंगळवारी शपथविधीचा कार्यक्रम घेण्यासंदर्भात सहमती होताना दिसत आहेत. फार मोठी घडमोड घडली नाही तर नियोजित कार्यक्रमानुसार १५ मार्चलाच योगी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काही मोजके मंत्री योगींसोबत मंत्रीमंडळातील सदस्य म्हणून शपथ घेतील.

नक्की वाचा >> Election Results: काँग्रेसमध्ये पुन्हा फूट?; पाच राज्यांमधील दारुण पराभवानंतर G-23 नेत्यांनी बोलवली बैठक

मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी निवडणुकीच्या निकालांनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शपथविधीच्या कार्यक्रमाबरोबरच इतर कार्यक्रमांबद्दलही सविस्तर चर्चा झाली. या बैठकीमध्ये राजभवनातील अधिकारीही उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.