संयुक्त जनता दलाचे नेते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक शरद यादव यांनी एका महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर काहीजणांनी टीका केली. संबंधित महिला पत्रकाराशी बोलताना त्यांनी तिला तुम्ही सुंदर आहात, असे म्हटले. याच वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाली.
मध्य प्रदेश आणि बिहार यापैकी कोणत्या राज्यातून तुम्ही निवडणूक लढविणार, असे विचारल्यावर यादव म्हणाले, दोन्ही राज्ये सुंदर आहेत. संपूर्ण देशच सुंदर आहे. तुम्हीदेखील सुंदर आहात.
थट्टा करण्याच्या हेतून त्यांनी हे वक्तव्य केल्याचे संबंधित महिला पत्रकाराच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने त्या वक्तव्याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली आणि खेदही व्यक्त केला नाही. मात्र, काही वृत्तवाहिन्यांनी हे वक्तव्य यादव यांच्यासाठी अशोभनीय असल्याचे म्हटले.
यादव काहीही चुकीचे बोललेले नाही. सर्वच मुली सुंदर असतात, अशी प्रतिक्रिया देत जनता दलाच्या एका नेत्याने यादव यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा