कैरो : इजिप्तमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे ‘भारताचे नायक’ असे वर्णन करून त्यांची प्रशंसा केली. गेल्या २६ वर्षांत व्यूहात्मकदृष्टय़ा महत्त्वाच्या इजिप्त या पश्चिम आशियाई देशाला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये त्यांचे शानदार स्वागत करण्यात आले. येथे त्यांनी विविध गटांत अनिवासी भारतीयांशी चर्चा केली. यावेळी बहुतांश अनिवासी भारतीयांनी मोदींचे अमेरिकन काँग्रेसमधील ऐतिहासिक भाषणाची प्रशंसा केली. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दलही त्यांची स्तुती केली.

या समूदायातील एक सदस्य मोदींना म्हणाला, की तुम्ही भारताचे नायक आहात. त्याला प्रत्युत्तरादाखल मोदींनी सांगितले, की परदेशात राहणाऱ्या भारतीयांसह प्रत्येक देशवासीयाने देशाच्या यशामध्ये आपले योगदान दिले आहे. अवघा भारतच आपल्या प्रत्येकाचा नायक आहे. आपले देशवासीय कष्ट करतात म्हणून देशाची प्रगती होते.

‘ये दोस्ती हम नही तोडेंगे!’

पंतप्रधानांचे येथील हॉटेलमध्ये आगमन झाल्यावर भारतीय समुदायाच्या सदस्यांनी तिरंगा फडकवत ‘मोदी, मोदी’ ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. साडी परिधान केलेल्या इजिप्शियन जेना हिने ‘शोले’ चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नही तोडेंग’ हे लोकप्रिय गाणे गाऊन मोदींचे स्वागत केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You are india s hero indian community members praise pm modi in egypt zws
Show comments