रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी उत्तर कोरियाला भेट दिली. पुतीन सोलमध्ये उतरल्यानंतर, किम जोंग आणि त्यांच्यात आधी कारमध्ये कोण प्रवेश करेल यावरून चर्चा सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हारयल होणाऱ्या व्हिडिओमध्ये व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग कारमध्ये बसण्याकरता एकमेकांना आग्रह करताना दिसत आहेत. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांनी पुतिन यांना आधी कारमध्ये बसम्याची हाताने विनंती केली. परंतु, पुतिन यांनी किम जोंग यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. बराचवेळ दोघेही एकमेकांना गाडीत बसण्यासाठी विनंती करत राहिले.
हा व्हिडिओ डेली मेलने आधी प्रसारित केला. हा व्हिडिओ एक्सवर १३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर कमेंट्सही भन्नाट आले आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “किम गाडी चालवत होता.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “बायडेन चुकीच्या कारमध्ये चढले असतील.” “त्या दोघांना वाटते की त्यात बॉम्ब आहे,” दुसऱ्या वापरकर्त्याने विनोद केला. दरम्यान, किम जोंग आधी गाडीत चढले.
Kim Jong Un and Vladimir Putin argue over who gets in the car first pic.twitter.com/bf4IbDiKe2
— Daily Mail Online (@MailOnline) June 19, 2024
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना रशियन-निर्मित ऑरस लिमोझिन, एक चहाचा सेट आणि ॲडमिरलची डिर्क भेट दिली, असे रशियाच्या राज्य वृत्तसंस्थेने बुधवारी क्रेमलिनच्या सहाय्यकाच्या हवाल्याने म्हटले आहे.