‘तुम्ही तुमच्या लेखणीलाही झाडू बनविल्याबद्दल तुमचे मनापापासून आभार’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. स्वच्छ भारत अभियानाबाबत जागृती निर्माण करण्यात प्रसारमाध्यामांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत, प्रसारमाध्यमांमुळेच ‘स्वच्छता अभियान’ ही सरकार आणि नागरिकांची एकत्रित जबाबदारी असल्याच्या संकल्पनेला बळ मिळाल्याचे त्यांनी नरेंद्र मोदी म्हणाले. दिल्लीत भाजप मुख्यालयात दिवाळीनिमित्त आयोजित ‘दिवाळी मिलन’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिकरित्या संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

प्रसारमाध्यमांकडून आम्हाला फक्त बातम्याच कळत नाहीत तर काय करायला हवं याबाबतही माहिती मिळत असते, असंही मोदी यावेळी म्हणाले. तसेच ज्या वरिष्ठ पत्रकारांनी कधीही ‘स्वच्छता’ या विषयावर लिहिले नव्हते तेसुध्दा या विषयावर लिहिते झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. 

Story img Loader