दिलसुखनगर स्फोटांतील मृत आणि जखमींमध्ये तरुणांचा तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीकरिता पुस्तक खरेदीसाठी आलेले विजय कुमार आणि एझाझ अहमद स्फोटात ठार झाले. या दोघांबरोबरच एमबीए करणारा राजशेखर, अभियांत्रिकी शाखेचा हरीश आणि एमबीएची तयारी करीत असलेली स्वप्ना स्फोटांत मरण पावले आहेत. या परिसरात अनेक शैक्षणिक संस्थाही आहेत.

Story img Loader