Crime News “तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे. आम्ही तिला ताब्यात घेतलं आहे. जर तिला सोडवायचं असेल तर एक लाख रुपये पाठवा.ठ असा फोन कॉल एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेला आला. ज्यानंतर या शिक्षिका प्रचंड तणावात आल्या. त्यांच्या हृदयावरचा ताण वाढला आणि हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी कुठल्याही सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली नव्हती. मात्र डिजिटल अरेस्टच्या फेक कॉलमुळे या शिक्षिकेला तिचा जीव गमावावा लागला.

कुठे घडली आहे ही घटना?

डिजिटल अरेस्टची ही घटना आग्रा या ठिकाणी घडली आहे. डिजिटल अरेस्ट हा एक प्रकारचा फ्रॉड कॉलचा प्रकार आहे. सायबर गुन्ह्यांमधल्या गुन्ह्यात या घटनेची भर पडली आहे. आग्रा या ठिकाणी घटना घडली. पोलीस निरीक्षक दीपांशू राजपूत यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार मालती वर्मा या शिक्षिकेचा डिजिटल अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यांनी हेदेखील सांगितलं की ज्या कॉलरने मालती वर्मा यांना फोन केला त्याने स्वतः तो पोलीस निरीक्षक असल्याचं सांगितलं. तसंच एक लाख रुपये द्या म्हणजे तुमच्या मुलीला आम्ही सेक्स रॅकेटमधून सोडवू अशी मागणी त्याने केली. वास्तवात हा फेक कॉल होता. मात्र घडलेल्या घटनेचा ताण येऊन मालती वर्मा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राजपूत म्हणाले जेव्हा मालती वर्मा यांना हा फोन आला तेव्हा त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात फोन केला होता. माझ्याशी त्यांचं बोलणं झालं. मी नंबर तपासला तेव्हा फेक नंबर आहे हे मला समजलं. त्यांना हा कॉल व्हॉट्स अॅपवरुन आला होता. मात्र या कॉलचा ताण सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असंही राजपूत यांनी सांगितलं.

Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
spy cam in delhi
Spy Cam: तरुणीच्या बाथरूम व बेडरूमच्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा; घरमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, दोन लॅपटॉपमध्ये सापडले Video!
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल
Counselling Different behaviors by mother with two sisters
समुपदेशन : आईकडून बहिणींमध्ये दुजाभाव?
EY Employee Death News
EY Employee Death : “मॅनेजर क्रिकेटच्या सामन्यानुसार कामाचं वेळापत्रक बदलायचे, म्हणून…”, ॲनाच्या वडिलांचा गंभीर आरोप
pune employee stress death
पुण्यातील तरुणीचा मृत्यू कामाच्या ताणामुळे? जास्त कामाचा तिच्या प्रकृतीवर कसा परिणाम झाला? किती टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना कामाचा ताण?
68 people died due to epidemic diseases
राज्यात साथीच्या आजारांनी वर्षभरात ६८ जणांचे मृत्यू , स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सर्वाधिक बळी

Digital Arrest scam: ‘डिजिटल अटक’ करत उत्तर प्रदेशच्या प्रतिष्ठित महिला डॉक्टरची २.८ कोटींची फसवणूक; सहा दिवस घरातच कैद

मालती वर्मा या आग्रा येथील महाविद्यालयात शिक्षिका होत्या

मालती वर्मा या आग्रा येथील राजकीय कन्या ज्युनिअर हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती निवृत्त झाले आहेत. तर त्यांना एक मुलगा आहे त्याचं लग्न झालं आहे. त्यांना दोन मुली आहेत ज्या शिकत आहेत. ३० सप्टेंबरला त्या वर्गात मुलांना शिकवत होत्या, त्यावेळी त्यांना डिजिटल अरेस्टचा कॉल आला. ज्या नंबरवरुन फोन आला होता त्यावर पोलिसाचा फोटो होता त्यामुळे मालती वर्मा यांनी तो फोन कॉल उचलला. त्या फोनवर बोलणाऱ्या माणसाने सांगितलं की तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे. तिला आम्ही ताब्यात घेतलं आहे. तिला सोडवायचं असेल तर एक लाख रुपये ऑनलाइन पाठवा. तुम्ही असं केलं नाही तर आम्ही तिला तुरुंगात धाडू, पण तुम्ही एक लाख रुपये दिले तर तिच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही आम्ही तिला सोडून देऊ. असं त्या कॉलरने मालती वर्मा यांना सांगितलं.

मालती वर्मा यांनी मुलाशीही फोनवरुन केली चर्चा

मालती वर्मा यांनी फोन ठेवला पण त्या भीतीने गर्भगळीत झाल्या. त्यांची प्रकृती बिघडली. हा कॉल त्यांना एकदाच आला नाही. त्यानंतरही आला. त्यामुळे त्या घाबरल्या त्यांना ताण आला. त्या ताणामुळे हृदयविकाराचा झटका आला. मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे हे म्हटल्यावर त्या घाबरुन गेल्या. मालती वर्मांना फोन आल्यानंतर मालती वर्मांनी त्याबाबत त्यांच्या मुलालाही सांगितलं. त्यानंतर मुलाने त्याच्या बहिणीला फोन केला होता. त्याने आईला फोन करुन सांगितलं की त्याची बहीण म्हणजेच मालती वर्मांची मुलगी कॉलेजमध्ये आहे. मुलाने आईला सांगितलं की घाबरु नकोस तो फेक कॉल होता. मात्र मालती वर्मा कॉल जास्तवेळा आल्याने टेन्शनमध्ये आल्या होत्या. त्या कशाबशा घरी पोहचल्या. त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना तातडीने आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना फेक कॉल कसा आला होता आणि पुढे काय काय घडलं ते पोलिसांना समजलं.