सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना मोजक्या शब्दांत उत्तरे द्या, असा सल्ला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांना दिला. पियुष गोयल गुरूवारी लोकसभेत औष्णिक उर्जेसंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देत होते. गोयल यांनी उत्तरादाखल दिलेल्या या भाषणावर मुलायमसिंह यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटले की, तुम्ही तरूण आणि उत्साही आहात. तुम्ही चांगले कामही करत आहात. मात्र, सभासदांच्या प्रश्नांना थोडक्यात उत्तर कशी देता येतील, याचे भान तुम्ही ठेवले पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले.
मुलायमसिंह यांनी गोयल यांच्या लांबलचक उत्तरांच्या शैलीवर आक्षेप घेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केवळ होय किंवा नाही, असे उत्तर देणे अपेक्षित असल्याचे सांगितले. यापूर्वी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान १५-१६ प्रश्न मांडले जात असत. मात्र, गोयल यांच्या शैलीमुळे मोजक्याच प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असा आक्षेप मुलायमसिंह यांनी नोंदवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा