जमालपूर एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या एका युवकाकडून शनिवारी बर्दवान स्थानकात पोलिसांनी आठ अत्याधुनिक पिस्तुले आणि स्फोटकांचा साठा हस्तगत केला.
सदर युवकाचे नाव प्रणबकुमार सिंग असे असून त्याच्याकडून ९ एमएमची आठ पिस्तुले आणि १६ काडतुसे आणि ७० स्फोटके असा साठा जप्त केला. बिहारमधील मुंगेर येथून आपण हा साठा आणला असून तो कटकमध्ये नेण्यात येत होता, असे सिंग याने चौकशीदरम्यान सांगितले.पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा याच गाडीतून शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत केला होता. सदर गाडी बर्दवान जंक्शन येथे थांबली असता हा साठा पकडण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader