आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने दहा तास चौकशी केली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यादरम्यान युवा काँग्रेसचे प्रमुख श्रीनिवास बी व्ही दिल्ली पोलिसांनी रोखल्यानंतर पळून गेल्याचा व्हिडीओ भाजपा नेत्यांकडून सोशल मीडियावर शेअर करत ट्रोल करण्यात आलं. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटरला आणखी एक व्हिडीओ शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत काँग्रेस नेते श्रीनिवास बी व्ही कारमधून उतरताच पोलीस कर्मचारी त्यांच्याजवळ जाताना दिसत आहे. पोलीस कर्मचारी कारवाई करणार असल्याचं लक्षात येताच श्रीनिवास सुटका करुन घेत पळ काढतात.

पोलिसांकडून पी चिदंबरम यांना धक्काबुक्की, हाड मोडलं; म्हणाले “जेव्हा तीन पोलीस कर्मचारी तुमच्या…”

Maharashtra Latest News Live : पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर

दरम्यान व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर श्रीनिवास यांनी ट्विटरला आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी नेमकं काय झालं होतं हे सांगितलं असून ट्रोल करणाऱ्यांना आणि भाजपा नेत्यांना उत्तर दिलं आहे.

“जेव्हा पोलीस सत्याग्रहींवर कारवाई करतात तेव्हा कोणीही फळ काढत नाही हे इतिहास सांगतो. वीर सावकरांप्रमाणे लाठी, गोळ्या, जेल, काळ्या पाण्याची शिक्षा यांचा सामना करतात,” असं सांगत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी काँग्रेस नेत्यावर टीका केली. भाजपा प्रवक्ते अजय शेरावत यांनीही व्हिडीओ शेअर करत श्रीनिवास यांना ट्रोल केलं.

यानंतर श्रीनिवास यांनी ट्वीटरला आंदोलनातील व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत श्रीनिवास यांनी आंदोलन करण्यासाठी आपण पोलिसांच्या तावडीतून पळून गेलो होतो असं स्पष्टीकरण दिलं आहे. श्रीनिवास आंदोलन करत असून त्यांच्याभोवती पोलिसांचा जमाव कारवाई करताना दिसत आहे. “आधी ते तुम्हाला दुर्लक्षित करतील, नंतर हसतील, नंतर लढतील आणि मग तुमचा विजय होईल,” हे महात्मा गांधींचं वाक्यही त्यांनी या व्हिडीओसोबत शेअर केलं आहे.

राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये पी चिदंबरम यांचाही समावेश होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत पी चिदंबरम यांच्या बरगड्यांना दुखापत झाली असून हाड मोडलं आहे. पोलिसांनी धक्का दिल्यानंतर पी चिदंबरम जखमी झाले असून हाड मोडलं असल्याचा दावा रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. चिदंबरम यांचा चश्माही जमिनीवर फेकला गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यसभा खासदार के सी वेणुगोपाल यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.