काश्मीर खोऱ्यातील अशांततेने शुक्रवारी आणखी एका तरुणाचा बळी घेतला आहे. दगडफेक करणाऱ्या तरुणाईवर केलेल्या गोळीबारात एक तरुण ठार झाल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली. काश्मीरमधील बारमुल्ला जिल्ह्यामध्ये निदर्शने करताना जमावाने सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. दरम्यान जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात तरुण ठार झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहाणवानी आठ जुलै रोजी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात सुरू झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. काश्मीरमधील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काश्मीरमध्ये अनावर जमावाचा हिंसाचार सुरू असेपर्यंत बळाचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात रस्त्यांवर सुरू असलेली निदर्शने नियंत्रणात आणण्यासाठी छेऱ्याच्या बंदुकांचा (पेलेट गन्स) वापर करण्यात येत आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा विचार करून, तसेच पेलेट गन्सला पर्याय शोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने तज्ज्ञांची एक समिती देखील गठित केली आहे. सरकारने काही निर्णय घेईपर्यंत, पेलेट गन्सचा वापर केवळ अपवादात्मक आणि आत्यंतिक परिस्थितीत करण्याचा आदेश सरकारने दिले आहेत.