काश्मीरच्या उत्तरेकडील बारामुल्ला भागात निदर्शने करणाऱ्यांवर सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक युवक ठार झाला, तर चार जण जखमी झाले. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लष्कराच्या जवानांनी आमची घरे लुटली असा आरोप करून त्याच्या निषेधार्थ बारामुल्ला शहरातील हजारो रहिवासी रस्त्यावर उतरून निदर्शने करीत होते. त्यानंतर निदर्शकांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली, त्यामुळे लष्कराने जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार केला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
या गोळीबारात पाच जण जखमी झाले, त्यापैकी एका युवकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून त्याचे नाव ताहीर लतिफ असे आहे. अन्य एका गंभीररीत्या जखमी झालेल्या निदर्शकाची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, या गोळीबाराची चौकशी करण्याची घोषणा ओमर अब्दुल्ला यांनी जम्मूत विधानसभेत केली. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, जमावावर गोळीबार करण्याच्या घटनेचे समर्थन करता येणार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले.

Story img Loader