येथील एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करून व तिची नग्न छायाचित्रे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर टाकल्याची घटना येथे घडली. सदर तरुण पुणे येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
पोलिसांनी सांगितले, की अल्लम राजक मकाकमायुम याने एका मणिपुरी मुलीवर बलात्कार केला, त्याची तिच्याशी वर्षभरापासून मैत्री होती. सप्टेंबर २०१२ मध्ये त्याने तिला मेघालयात तुरा येथे नेले व तेथील लॉजवर गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले व नंतर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तो पुण्याला निघून आला. तो पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली तुरा येथील पीडित तरुणी मणिपूर येथील थौबल जिल्हय़ातून सुटीनंतर परत घरी आली त्या वेळी तिची नग्न छायाचित्रे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर टाकल्याचे दिसून आले. पोलीस या प्रकरणी मूळ मणिपूरचा असलेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Story img Loader