Shahrukh Khan : गेल्या महिन्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध व्यक्तींच्या घरांची रेकी करून तिथे चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२३ मध्येही अभिनेता शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यात २१ वर्षीय तरुण चोरीच्या उद्देशाने शिरला होता. आता त्याला भरूच येथून अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलंआहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यात २०२३ मध्ये २१ वर्षीय तरुण शिरला होता. त्याने आता निवृत्त लष्करी जवान सिराज मेहता यांच्या भरूच येथील मोना पार्क सोसायटीत घरफोडी केली. या घरफोडीत त्याने लाखो रुपये चोरले आहे. या प्रकरणातील आरोपी राम स्वरुप कुशवाहला अटक करण्यात आली आहे. त्याने ३.९० लाखांचा ऐवज चोरी केलाय.

३.९० लाखांचा ऐवज चोरीला

मिनहाज सिंधा याने राम स्वरुप कुशवाहाला सिराज मेहता यांच्या घरी चोरी करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, १३ फेब्रुवारी रोजी मेहता कुटुंब लग्नासाठी बाहेर गेलेले असताना ही चोरी करण्यात आली. कुशवाहाने घरातून ३.९० लाख रुपयांचे सोने, चांदी आणि रोख रक्कम चोरले. भरूचचे पोलीस उपअधीक्षक सीके पटेल म्हणाले, “कुशवाह आणि मिनहाज सिंधा यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्या ताब्यातून २.७४ लाख रुपयांच्या चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.”

शाहरुखच्या घरीही केली होती चोरी

चौकशीदरम्यान, कुशवाहाने कबूल केले की त्याने यापूर्वी अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत बंगल्यात घुसखोरी केली होती. ही घटना २ मार्च २०२३ रोजी घडली होती. कुशवाह आणि त्याचा मित्र बंगल्याच्या बाहेरील भिंतीवर चढले. भिंतीवरून ते थेट शाहरूK खानच्या मेकअप रुममध्ये शिरले. तिथे गेल्यावर त्यांनी आठ तास विश्रांतीही घेतली. त्यानंतर त्यांना पकडण्यात आलं होतं. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भरूच बी-डिव्हिजनचे पोलिस निरीक्षक आरएम वसावा म्हणाले की, सिंधा यांनी पीडितेच्या निवासस्थानाशी ओळख असल्याने स्वतःची ओळख पटू नये म्हणून कुशवाहला घरफोडीसाठी पाठवलं होतं. कुशवाहाने टेरेसवरून खाली उतरून आणि स्लायडर विंडोमधून पहिल्या मजल्यावर प्रवेश करून घरात प्रवेश केला. सिंधाने कुशवाहाला चोरीच्या मौल्यवान वस्तूंपैकी ५०% वाटा देण्याचे आश्वासन दिले. सिंधावर चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत, तर आम्हाला संशय आहे की कुशवाह अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे.”

भरूच जिल्ह्यातील अमोद शहरातील रहिवासी असलेल्या कुशवाहाला १७ फेब्रुवारी रोजी घरफोडीनंतर मुंबईतील त्याच्या काकांच्या घरी काही काळ राहिल्यानंतर अमोदला परतल्यानंतर अटक करण्यात आली. भरूच पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक मुंबईला पाठवले पण अखेर गुजरातमध्ये त्याला अटक करण्यात आली.