भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते व बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना काही विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवत सिन्हांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न सिन्हा आपला लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना काही विद्यार्थ्यांच्या गटाने काळे झेंडे दाखवत सिन्हांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सिन्हा यांच्या समर्थकांनी या विद्यार्थ्यांच्या हातातील काळे झेंडे हिसकावून त्यांना मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर सिन्हा, त्यांची पत्नी पूनम सिन्हा आणि मुलगा लव सिन्हा यांच्यासह पुढे रवाना झाले व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Story img Loader